राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोड यंत्र खरेदीसाठी सन-२०२२-२०२३ आणि सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांचेकडून मान्यता देण्यात आली आहे.
सदरची योजना बँकेमार्फत राबविणे अपेक्षित असल्याने आणि विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही या कारणास्तव सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णयातील अटी शर्ती आणि निकषांसह मुदतवाढ देण्यात आली आहे.
दि.३१/०७/२०२४ च्या पत्राने साखर आयुक्त, पुणे यांनी तांत्रिक कारणासह विहित मुदतीत कर्ज प्रकरणे मंजूर करणे तसेच राज्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे ग्रामीण भागात ऊस तोडणी यंत्र पोहोच होणे अवघड होत आहे.
विहित मुदतीत यंत्र खरेदीची कार्यवाही पूर्ण करणे शक्य झाली नसल्याच्या कारणास्तव दि. २२/०५/२०२४ पर्यत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस दि.३१/०७/२०२४ पर्यत दिलेली मुदतवाढ केवळ एकदाच अपवादत्मक बाब म्हणून दि.१५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत वाढविण्याची विनंती केली आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासंदर्भात शासन निर्णय तसेच सदर दि. २०/०३/२०२३ च्या शासन निर्णयातील अटी, शर्ती व निकषांवर दि. २९/०५/२०२४ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली मुदतवाढ आणि आता दि. ३१/०७/२०२४ च्या पत्राने साखर आयुक्त, पुणे यांनी विषद केलेली तांत्रिक अडचण पाहिली.
तसेच अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नयेत या दृष्टिकोनातून साखर आयुक्तालयाने दि. २२/०५/२०२४ रोजीपर्यत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोड यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस एक विशेष बाब म्हणून दि. १५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.