Join us

केंद्राबरोबरच राज्य सरकारचीही पेन्शन, आता मिळणार वर्षाला १२ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 3:10 PM

केंद्र सरकारच्या दोन हजार पेन्शन सोबतच राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान' निधीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी आणखी गोड होणार असून केंद्र सरकारच्या दोन हजार पेन्शन सोबतच राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान' निधीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ७१ हजार ३६७ शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, आयकर भरणारे, सरकारी- निमसरकारी कर्मचाऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना 'केवायसी' पूर्तता करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यासाठी एक वर्षांची मुदतही दिली होती. पात्र शेतकऱ्यांपैकी ९१ टक्के शेतकऱ्यांनी 'केवायसी' ची पूर्तता केली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शनचा चौदावा हप्ता जमा झाला.

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारने 'नमो शेतकरी महासन्मान' निधी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी केंद्राच्या हप्त्यासोबत दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी थोडी अधिकच गोड होणार आहे.

शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपयेकेंद्र व राज्य सरकारच्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत. या पेन्शनमुळे सामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

४४ हजार शेतकऱ्यांची आधार लिंक बाकीशासनाने अनेक वेळा आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तरीही पात्र, शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे अद्याप ४४ हजार शेतकऱ्यांची आधार लिंक होणे बाकी आहे.

त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया संथ- पीएम किसानचे काम कोणी करायचे? या वादात वर्ष गेले. अखेर महसूलकडून कृषी विभागाकडे जबाबदारी आली.- आता कृषी सहायकांकडे तक्रारी येऊ लागल्या आहेत. मात्र, त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया एकदम संथ असल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाकेंद्र सरकारशेतकरीनिवृत्ती वेतनराज्य सरकार