Join us

फळबाग लागवडीसाठी मिळतंय १०० टक्के अनुदान करा या पोर्टलवरून अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 2:49 PM

फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून bhausaheb fundkar falbag lagvad yojana १०० टक्के अनुदान मिळत आहे.

सातारा जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून १०० टक्के अनुदान मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरले आहे. मागील एक वर्षात जिल्ह्यातील २५५ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागत आहे.

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये फळबागांसाठीही योजना आहे. याचा सातारा जिल्ह्यातील शेतकरी लाभ घेत आहेत. त्यातच जिल्ह्यात वातावरण अनुकूल, जमिनीची सुपिकता, तसेच दुसरीकडे विभागानुसार ३०० ते ५ हजार मिलिमीटरपर्यंत पडणारा पाऊस अशा वैविध्यपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यात विविध फळे होतात.

सध्या जिल्ह्यात विविध प्रकारची ४० प्रकारची फळे घेतली जातात. त्यातच सध्या जिल्ह्यात डाळिंब बागांचे सर्वाधिक क्षेत्र आहे. यातील काही फळे कमी पावसाच्या भागात होतात. राज्यात शासनाच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाही सुरू आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ घेता येतो. संस्थात्मक लाभार्थ्यांना योजना लागू होत नाही.

योजनेसाठी अशा आहेत अटी■ शेतकऱ्यांच्या नावे सातबारा असणे आवश्यक.■ सातबारावर लाभार्थी संयुक्त.■ खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे.■ फळबाग लागवडीसाठी संमतिपत्र.■ लाभक्षेत्र मर्यादा २० गुंठे ते ६ हेक्टरपर्यंत.■ अर्ज नोंदणी आधार प्रमाणीकरण करून महाडीबीटी पोर्टलवर करावी.■ शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने होणार.

शासन १०० टक्के अनुदानित कामेखड्डे खोदणे. कलम आणि रोपे लागवड करणे. सेंद्रिय व रासायनिक खते देणे. नांग्या भरणे.

शेतकऱ्यांनी करावयाची कामेजमीन तयार करणे. माती, शेणखत, सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे. आंतरमशागत करणे. काटेरी झाडांचे कुंपण करणे.

योजनेत १६ फळांचा समावेश या योजनेत १६ बहुवार्षिक फळांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्री, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजिर, चिकू आदींचा समावेश आहे.

मापदंडानुसार अनुदान असे मिळणार (हेक्टरमध्ये)■ आंबा कलमी : १० बाय १० मीटर लागवड - ७१,९९७ रुपये■ आंबा कलमी : ५ बाय ५ मीटर - १ लाख ४० हजार■ डाळिंब : ४.५ बाय ३ मीटर - १,२६,३२१ रुपये■ सीताफळ कलमी : ५ बाय मीटर. ४०० रोपे - ९१,२५१ रुपये■ पेरू कलमी : ३ बाय २ मीटर - २,३३,८२९ रुपये

सव्वाकोटीचे अनुदान वाटपभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत मागील वर्षभरात २५५ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. यातून सुमारे १५० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. तर लाभार्थी शेतकऱ्यांना १ कोटी २४ लाख ३३ हजारांचे अनुदान देण्यात आलेले आहे.

वेगवेगळ्या वातावरणात तब्बल ४० फळे घेतली जातात. जिल्हा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट म्हणून पुढे येत आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग निर्माण झालेला आहे. राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून १०० टक्के अनुदानावर फळबाग लागवड करता येत आहे. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :फलोत्पादनसरकारसरकारी योजनाशेतकरीशेतीफळेपीक