हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४, २१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५,१४२ गावांमध्ये ६ वर्षे कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रु. ४,००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२ च्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वित्त विभागाच्या शासन परिपत्रकान्वये सन २०२४ साठी महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियमानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे निधी वितरण निश्चित करण्यात आलेले आहे.
त्यानुसार वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांनी केलेल्या मागणीनुसार शासन निर्णयान्वये आतापर्यंत रुपये २.२० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.
वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांच्या पत्रान्वये सन २०२४-२५ मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या माहे मे देय जून, २०२४ च्या वेतन खर्चासाठी निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.
त्यानुसार सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून रु. १.०० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
सन २०२४-२५ करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना रु. १.०० कोटी (अक्षरी रुपये एक कोटी फक्त) निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अधिक वाचा: PM Kisan Samman Nidhi पी एम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर