Lokmat Agro >शेतशिवार > रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-२ योजनेला मान्यता

रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-२ योजनेला मान्यता

Approval of Silk Samagra-II scheme for development of silk industry | रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-२ योजनेला मान्यता

रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-२ योजनेला मान्यता

राज्यातील रेशीम शेतीला चालना मिळून राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ ISDSI (Integrated Scheme for Development of Silk Industry) ही योजना २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या रेशीम उद्योग राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. त्यामुळे या उद्योगाचा विकास करण्यासाठी महारेशीम अभियान राबवून तुती लागवड करणाऱ्या व टसर रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या नवीन लाभार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणावर मोहिमही राबविण्यात आली आहे.

अधिक वाचा: रेशीम व्यवसाय करताय; अनुदानासाठी कुठे कराल अर्ज?

तुती व टसर रेशीम कोषावर राज्यातच प्रक्रिया होणे आवश्यक आहे. राज्यात पिवला, पैठण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कारागिरांमार्फत हातमागांवर वर्षानुवर्षे पैठणी विणकाम सुरु आहे. त्याचप्रमाणे नागपूर, भंडारा, आंधळगाव या ठिकाणी टसर साड्या व कापड निर्मितीचे काम सुरु आहे. सिल्क समग्र-२ या योजनेसाठी जिल्हा व प्रादेशिक स्तरावर समिती स्थापन करण्यात येऊन लाभार्थीची नियुक्ती करण्यात येईल.

Web Title: Approval of Silk Samagra-II scheme for development of silk industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.