Join us

हिरव्या पालेभाज्या खाणे खरोखरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:40 IST

पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक आढळतात. यामध्ये लोह, जीवनसत्त्वे, खनिज, फायबर्स, अॅन्टीऑक्सिडंट्स प्रामुख्याने असतात. या प्रत्येक घटकांची वेगवेगळी शरीरोपयोगी कार्ये अपेक्षित असतात.

पालेभाज्या आपल्या दैनंदिन आहारामध्ये असाव्यात, असे अनेकदा आपण वाचले किंवा ऐकले असेलच, घरामधील लहान मुले, मोठ्या व्यक्तीसुद्धा पालेभाज्या खात नाहीत असे कित्येक प्रसंगी आपल्या कानावरून गेले असणारच.

पालेभाज्या आजकाल मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनसुद्धा त्यांचा दैनंदिन आहारामध्ये उपयोग करणारी मंडळी नगण्य आहेत. शाकाहाराचा पुरस्कार करणारा म्हणजेच शुद्ध शाकाहारी असणारे यांच्या आयुष्याची दोरी नक्कीच प्रबळ असते, यात शंकाच नाही.

शाकाहाराचा पुरस्कार करण्यासाठी आजकाल अनेक संस्था, संघटना पुढे येत आहेत. शारीरिकदृष्ट्या विचार केल्यास समान आहार द्रव्यांच्या सेवनाने शरीरातील समान घटकांची वृद्धी होत असते.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे सतत चरबीयुक्त आहार खाणाऱ्या व्यक्तींच्या शरीरामध्ये चरबी आस्त प्रमाणात साचून लठ्ठपणाला अप्रत्यक्षपणे आमंत्रण दिले जाते.

पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक आढळतात. यामध्ये लोह, जीवनसत्त्वे, खनिज, फायबर्स, अॅन्टीऑक्सिडंट्स प्रामुख्याने असतात. या प्रत्येक घटकांची वेगवेगळी शरीरोपयोगी कार्ये अपेक्षित असतात.

भाज्यांच्या विशेष करून पालेभाज्यांच्या सेवनाने शरीरांतर्गत ऊर्जेची वाढ होत असते. लोह, कॅल्शिअम व जीवनसत्त्वांच्या उपलब्धतेमुळे शाकाहारी घटक पालेभाज्यांमधून सहजच मिळत असतात.

पालेभाज्यांच्या आहारातील अंतर्भावामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. पालक, मुळा, अळू, मेथी, शेपू, शेवग्याचा पाला, कुई, चूका, चाकवतसारख्या हिरव्या पालेभाज्या सर्वत्र उपलब्ध होतात.

पावसाळ्याच्या मध्यानंतर तर रानभाज्यासुद्धा मिळतात. पालेभाज्यांमध्ये असलेले तंतूमय पदार्थ किंवा फायबर्स आतड्यांमधील मल निर्मितीसाठी तसेच इतर शरीरोपयोगी कार्यासाठी उपयुक्त असतात.

पालेभाज्यांमध्ये मीठ म्हणजेच सोडियम व पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पालेभाज्या शिजवून त्याचे सूप तयार करतात. सूप हे अत्यंत आरोग्यदायी असते.

जास्त प्रमाणात पालेभाज्यांमधील शिजवल्यामुळे महत्त्वाचे शरीरोपयोगी घटकांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. डीहायड्रेशन तंत्रामुळे पालेभाज्या परदेशांमध्ये सुद्धा उपलब्ध होत आहेत.

सर्वच पालेभाज्या कोणत्या ना कोणत्यातरी आजारांसाठी उपयुक्त ठरू शकतात. यात पाथरीची तसेच घोळाची भाजी किडनीच्या आजारासाठी उत्तम असते. रक्तवाढीसाठी पोकळा व इतरही भाज्या चांगल्या असतात. मधुमेही रुग्णांसाठी मेथी, शेपू फार उपयुक्त ठरतात.

वातविकारांसाठी अळू फार चांगले असते. निसर्गामध्ये अनेक ज्ञातपेक्षा अज्ञात पालेभाज्यांचे प्रकार आढळतात. अलग अलग प्रांतामध्ये भाज्यांचे प्रकार वेगवेगळे आढळतात. निसर्गाने प्राणीमात्रांसाठी भरभरून दिलेले आहे.

आपल्या निरोगी शरीरासाठी पालेभाज्यांचा अंतर्भाव आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. ज्या रुग्णांना रक्त पातळ राहण्यासाठी सुरू असलेल्या वारफेरीन, अॅसिट्रॉम किंवा तत्सम गोळ्या पूर्वीपासून सुरू असतील अशा रुग्णांनी पालेभाज्या शक्यतो खाऊ नयेत.

डॉ. अनिलकुमार वैद्यप्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक

अधिक वाचा: Mutkhada : उन्हाळ्यात किडनी स्टोन मुतखड्याचा धोका का वाढतो? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :भाज्याआरोग्यमधुमेहहेल्थ टिप्सआहार योजना