एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अभ्यास दौऱ्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात फलोत्पादन शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया, मोठे प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास, आधुनिक तंत्रज्ञान व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करावी यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा दौरा फलोत्पादन क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या संशोधन संस्थांपैकी एका संस्थेच्या ठिकाणी १५ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.
लाभार्थ्यास इंग्रजी, हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक
- अभ्यास दौयासाठी अनुसूचित जाती १६ टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के, महिला ३० टक्के व लहान शेतकरी इत्यादींची प्राधान्याने निवड करण्यात येईल.
- लाभार्थ्यांची निवड किमान १५ दिवस अगोदर होईल. दौऱ्यासाठी लाभार्थ्यांस इंग्रजी अथवा हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- अभ्यास दौऱ्याकरिता प्रत्येक तालुक्यातील ३ लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज जास्त प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. अभ्यास दौऱ्याचा कालावधी ७ दिवसांचा असणार आहे.
- प्रति लाभार्थी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा लागणारा खर्च लाभार्थी शेतकऱ्यास स्वतः करावा लागेल. लाभार्थी १८ ते ६५ वयोगटातील
असावा. प्रशिक्षित लाभार्थी हे शेतीमध्ये बदल करणारे दूत असल्यामुळे अभ्यास दौऱ्यासाठी सुशिक्षित युवक वर्गाला प्राधान्य राहील.
तीन याप्रमाणे ९ शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. दौरा सात दिवसांचा असेल. प्रति शेतकरी ८ हजार या प्रमाणे खर्च अनुज्ञेय आहे. ९ पेक्षा कमी शेतकरी उपस्थित राहिल्यास प्रति शेतकरी प्रति दिन १ हजार याप्रमाणे जास्तीत जास्त ७ दिवसांकरिता अर्थसाहाय्य देय राहील, यामध्ये प्रवास खर्च, निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण साहित्य इत्यादी बाबींचा समावेश राहील. या अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय वर्धा, सेलू, देवळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे.