ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर व परिसरात कांदाकाढणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून, सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे.
पण पुढे जसे जसे कांदा काढणी होत जाईल तसे बाजारभाव राहतील की नाही यामुळे कांदा काढणी बाजारभाव असल्याने जलदगतीने कांदे मजुरांकडून काढून घेत आहेत.
कारण पुढे साठवणूक केलेल्या कांद्याला ही समाधानकारक बाजारभाव मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने कांदा पुढील काळात शेतकऱ्याला रडवतो की हसवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जुन्नर तालुक्यातील, ओतूर, रोहोकडी, धोलवड, आंबेगव्हाण, इंबरवाडी, ठिकेकरवाडी इतर गावांमध्ये कांदे काढणीला वेग आला असून, कांदे काढणीसाठी एकरी यावर्षी शेतमजूर चौदा ते पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त मजुरी शेतकऱ्यांकडून घेत आहे.
रोप टाकण्यापासून लावणी, फवारणी, खुरपणी, काढणी खर्च वाढला असल्याने शेतकरी कांदा काढण्यासाठी शेतकऱ्याला तारेवरची कसरत करत आहे. लागवडीपासून तर काढणीपर्यंत ७० ते ८० हजार एकरी खर्च येतो.
शेतकऱ्याची आधीच उसनवारी झाल्यामुळे त्यात मार्च महिना हा आर्थिक वर्ष समाप्तीचे असल्याने बँक, पतसंस्था, सोसायट्या याजकडून कर्ज व थकीत हप्ते भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादे चालू झाले आहेत.
मार्चमुळे काही शेतकऱ्यांच्या थकीत कर्जापोटी पुढील कारवाई होऊ नये आताच बाजारभाव आहेत तर कर्जमुक्त होईल म्हणून कांदा काढणी करत आहेत.
माळशेज परिसरात मध्यप्रदेशमधील शेतमजुरांचे आगमन
● सध्या शेतकऱ्यांना मध्यप्रदेश मधील शेतमजुरामुळे मजुरीत दिलासा मिळत आहे, तशी सर्वत्र कांदा काढणे सुरू असल्याने मजूर टंचाईदेखील आहे ओतूर, रोहोकडी उदापूर, धोलवड, आंबेगव्हाण, डुंबरवाडी, ठिकेकरवाडी, डिंगोरे, पिंपळगाव जोगा व परिसरातील गावामध्ये कांदा हेच शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून, कांदे लागवडीला महिलेला पाचशे ते सहाशे रुपये दर दिवसाचा रोज झाला होता.
● कांदे काढणीला ही हाच रोज झाला असता मात्र मध्यप्रदेश येथील शेकडो शेतमजुरांची कुटुंब कांदे काढणी दरम्यान ओतूर व परिसरातील गावात आल्यामुळे तसेच ते कांदे काढणी एकरप्रमाणे ठरवून तेरा ते चौदा हजार रुपयाला घेऊन शेतातच राहून कांदे काढत असल्याने स्थानिक शेतमजुरांची रोजंदारी कमी झाल्याने मजुरीचा दर नियंत्रणात राहिला आहे. पर्यायाने मध्यप्रदेश मधील शेतमजुरांच्या आगमनाने शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे असल्याचे पाहायला मिळत आहे.
बाजारभावाकडे लक्ष
कांदा काढणी बाजारभाव असल्याने जलदगतीने कांद मञ्जुरांकडून काढून घेत आहेत कारण पुढे साठवणूक केलेल्या कांद्याला ही समाधानकारक बाजारभाव मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने कांदा पुढील काळात शेतकऱ्याला रडवतो की हसवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शेतकरीवर्गात नाराजी
● ओतूर व परिसरातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कांदा पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. आता सध्या कांद्याला २० ते २५ रुपये भाव मिळत आहे.
● गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार ओतूर येथे ३० ते ३६ रुपयांपर्यंत भाव गेला होता बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरीवर्गात नाराजी पसरत आहे.
सध्या कांद्याला बाजारभाव २० ते २५ रुपये असले तरी ते भांडवली खर्चपेक्षा कमी आहेत, कारण दिवसेंदिवस खत औषधांची वाढलेली महागाई त्यात जीवनावश्यक वस्तूही दिवसेंदिवस किमती वाढत आहे; पण कांद्याचे दर शेतकऱ्यासाठी हे कमीच आहे कमीत कमी ३५ ते ४० रुपये भाव असतील त्यावेळी शेतकऱ्याला त्यातून काही तरी मिळेल आणि त्यातून उपजीविका भागवता येईल. - शरद फापाळे, कांदा उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: भारतातील पहिला शेतकरी मालकीचा साखर कारखाना कुठे सुरु झाला? अन् कशी झाली साखर क्रांती? वाचा सविस्तर