Lokmat Agro >शेतशिवार > Artificial Intelligence for Leopard : आता 'एआय'च सांगणार बिबट्या आला रे आला.. वाचा सविस्तर

Artificial Intelligence for Leopard : आता 'एआय'च सांगणार बिबट्या आला रे आला.. वाचा सविस्तर

Artificial Intelligence for Leopard : Now 'AI' will tell the leopard movement in rural area read in detail | Artificial Intelligence for Leopard : आता 'एआय'च सांगणार बिबट्या आला रे आला.. वाचा सविस्तर

Artificial Intelligence for Leopard : आता 'एआय'च सांगणार बिबट्या आला रे आला.. वाचा सविस्तर

वनविभागाच्या जुन्नर विभागातर्फे बिबट्या ओळखण्यासाठी किंवा त्याचे वास्तव्य आहे की नाही ते समजण्यासाठी 'एआय' कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी जुन्नर विभागाने एआयची प्रणाली तयार केली आहे.

वनविभागाच्या जुन्नर विभागातर्फे बिबट्या ओळखण्यासाठी किंवा त्याचे वास्तव्य आहे की नाही ते समजण्यासाठी 'एआय' कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी जुन्नर विभागाने एआयची प्रणाली तयार केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

श्रीकिशन काळे
पुणे: वनविभागाच्याजुन्नर विभागातर्फे बिबट्या ओळखण्यासाठी किंवा त्याचे वास्तव्य आहे की नाही ते समजण्यासाठी 'एआय' कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी जुन्नर विभागाने एआयची प्रणाली तयार केली आहे.

बिबट्या समोर आला की, त्या प्रणालीमधून सायरन वाजणार आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना बिबट्या तिथे असल्याचे कळणार आहे.

'एआय'द्वारे कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याची माहिती समजण्यासाठी ही प्रणाली विकसित केली. ही प्रणाली ५०० मीटरच्या परिसरातील बिबट्या किंवा इतर प्राण्यांचे छायाचित्र त्यात कैद होणार आहेत.

केवळ बिबट्या समोर असेल तरच सायरनचा शंभर टक्के आवाज होईल, अन्यथा इतर प्राणी आला तर तो आवाज वाढणार नाही, आपोआप बंद होईल तशी सुविधा त्यामध्ये केली आहे.

कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्र क्लाऊडवर जाईल. तिथे प्राण्याच्या चित्रावर प्रक्रिया होईल. बिबट्याची खात्री झाली की, सायरन वाजणार आहे. या प्रणालीसाठी सुनील चौरे यांनी मदत केली आहे.

प्रकल्पाचा उद्देश
बिबट्यांची ओळख पटविणे आणि त्यांच्या हालचालीचे निरीक्षण करणे, स्थानिक रहिवाशांना बिबट्यांच्या उपस्थितीबद्दल त्वरित माहिती देणे, बिबट्यांच्या आणि माणसांच्या संघर्षाचे प्रमाण कमी करणे.

४ तालुक्यांचा समावेश
जुन्नर वनविभागात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांचा समावेश होतो. हा विभाग सात यन परिक्षेत्रांमध्ये विभागलेला आहे.

डेटा विश्लेषण आणि सूचना
बिबट्यांच्या हालचालींचा डेटा एआय प्रणालीद्वारे संकलित होईल. बिबट्या दिसला की, त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि रहिवाशांना त्वरित दिली जाईल, यामुळे त्यांना सावधगिरी बाळगता येईल आणि आवश्यक ती पावले उचलता येतील.

उच्च-गुणवत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर
१) कॅमेरे आणि सेन्सर्स
जंगल परिसरात उच्च गुणवत्तेचे कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले जातील. हे कॅमेरे बिबटांच्या हालचाली टिपून तो डेटा एआय प्रणालीकडे पाठवतील.
२) एआय अल्गोरिदम
या प्रकल्पात अत्याधुनिक एआय अल्गोरिदमचा वापर करून बिबट्याची ओळख पटवली जाईल. हे अल्गोरिदम बिबट्यांच्या छायाचित्रांचा आणि व्हिडिओचा विश्लेषण करून त्यांची उपस्थिती निश्चित करतील.

बिबट नसबंदीसाठी जनहित याचिका
■ अवसरी येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संचालक मंडळ सभेत घेतलेल्या निर्णयानुसार बिबट नसबंदीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
■ बेंडे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्र आंबेगाव, शिरूर व परिसरात सध्या ऊस क्षेत्र भरपूर प्रमाणात वाडलेले असल्याने विवटवांना वास्तव्यास उपयुक्त जागा झालेली आहे. बिबट्याचे पाळीव प्राणी व जनावरे त्याचे मुख्य भक्ष्य आहे.
■ सध्या बिबट्यांची संख्या वाढल्याने हल्ले करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली असून, बिबट्या भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीवर येऊ लागले आहेत. पाळीव प्राण्यांबरोबरच ते लहान मुले, महिला व पुरुषांवर हल्ले करून लागल्याने हल्ल्यांमध्ये जखमी/मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
■ मनुष्य व पाळीव प्राणी यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी तसेच बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनामार्फत बिबट्याची नसबंदी करणे गरजेचे आहे.
■ बिबट्याची नसबंदी करण्याकरिता उच्च न्यायालय, मुंबई येथे अॅड. तेजस देशमुख यांच्यामार्फत कारखान्याच्यावतीने जनहित याचिका दाखल केली आहे. बिबट्या नसबंदी शासनामार्फत केल्यास हल्ले रोखण्यासाठी सर्वतोपरी मदत होणार आहे.

जुन्नरमध्ये अनेक घरे शेतामध्ये आहेत. त्या घरापासून १० मीटरवर बिबट्या आला तर त्याची माहिती कॅमेरा ट्रॅपद्वारे तीन सेकंदात क्लाऊडवर येईल. तो मेसेज लगेच सर्व अधिकाऱ्यांना पोहोचेल, त्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यासाठी उपयोग होईल. - स्मिता राजहंस, सहायक वनसंरक्षक, जुन्नर विभाग

एआय द्वारे बिबट्यांच्या हालचालींचा सखोल अभ्यास केला जाईल. बिबट्यांच्या सवयी आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल अधिक माहिती मिळवता येईल. जुन्नरमधील एआय बिबट ओळख प्रकल्पामुळे बिबट्यांच्या आणि माणसांच्या सहजीवनात सुधारणा होईल. स्थानिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल. - अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग

Web Title: Artificial Intelligence for Leopard : Now 'AI' will tell the leopard movement in rural area read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.