Lokmat Agro >शेतशिवार > अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग

अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग

Artisans busy making matha on the occasion of Akshaya Tritiya | अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग

अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग

वाढत्या महागाईचा कुंभारांच्या व्यवसायाला बसतोय फटका.

वाढत्या महागाईचा कुंभारांच्या व्यवसायाला बसतोय फटका.

शेअर :

Join us
Join usNext

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. मार्च महिना जवळपास संपत आलेला आहे. अनेक ठिकाणी रसवंती गृह, ज्यूस सेंटर सुरू झालेले आहेत. कडक उन्हात गार पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ विक्रीस सुरुवात झालेली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरीपासून जवळ असलेल्या कुक्कडगाव येथे कुंभार समाजातील व्यक्तींनी घरच्या कारखान्यात माठ, रांजणी, रांजण, तवली, केळी, चूल, हंडी आदी उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे.

१ एप्रिलपासून विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होईल, असे माठ उत्पादक सांगत आहेत. कुक्कडगाव येथे श्याम सोनाळकर, पाराजी सोनाळकर, ज्ञानेश्वर सोनाळकर या कुंभार समाजातील कुटुंबांनी परंपरागत व्यवसाय अजून टिकून ठेवलेला आहे. स्पर्धेच्या युगातही अजून त्यांचा हा व्यवसाय तग धरून आहे. कुंभार समाजातील या कुटुंबाची अक्षय तृतीयेसाठी केळी व इतर उत्पादने तयार करण्यासाठी लगबग सुरू आहे. माठातले पाणी पिल्याने सर्दी-पडसे होत नाही.

उलट फ्रीजचे पाणी प्यायल्याने टॉन्सिलचा त्रास होतो. सर्दी-पडसे होण्याची भीती असते, यामुळे आजही बरीचशी मंडळी उन्हाळ्यात माठाचे पाणी पिणे पसंत करतात. माठ, रांजणी, रांजण, केळी, तवली, हंडी, चूल आदी बनवण्यासाठी चिकण माती लागते. ती माती शहागडजवळील कुरण या गावी मिळते. कच्चा माल लवकर मिळत नसल्यामुळे माठ उत्पादन करण्यास अडचणी येतात, असे कुंभार बांधवांचे म्हणणे आहे.

शासनाने आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज उपलब्ध उपलब्ध करून द्यावे. काही सवलती मिळाल्यास व्यवसायात भरभराट येईल, असे ज्ञानेश्वर सोनाळकर यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात कुक्कडगाव, शहापूर, दह्याळा येथे, तसेच घनसावंगी तालुक्यात देवीदहेगाव व जालना तालुक्यात धारकल्याण- पीरकल्याण येथे कुंभार समाजातील व्यक्तींचे माठाचे उत्पादन करणारे कारखाने आहेत.

शरीराच्या तापमानानुसार पाणी प्यायल्याने पोषक तत्त्वांचे अधिक चांगले शोषण होते. ज्यामुळे चयापचय क्रिया वाढते. मातीच्या भांड्याचे पाणी सहज पचवले जाते, तर दुसरीकडे फ्रीजमधील थंडगार पाणी प्यायल्यास शरीराला पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. ज्यामुळे चयापचयक्रिया मंद होऊ शकते. - डॉ. शीतल शिनगारे, वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र, सुखापुरी

Web Title: Artisans busy making matha on the occasion of Akshaya Tritiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.