Lokmat Agro >शेतशिवार > तब्बल १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

तब्बल १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

As many as 1 crore 70 lakh farmers have taken out crop insurance | तब्बल १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

तब्बल १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

यंदा राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजनेची घोषणा केल्यानंतर त्यात दीडपटीने वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, या योजनेत आतापर्यंत सुमारे १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

यंदा राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजनेची घोषणा केल्यानंतर त्यात दीडपटीने वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, या योजनेत आतापर्यंत सुमारे १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात गेल्या वर्षी खरीप पीक विमा योजनेत सुमारे ५७ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यंदा राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजनेची घोषणा केल्यानंतर त्यात दीडपटीने वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, या योजनेत आतापर्यंत सुमारे १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हा शेतकऱ्यांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा ही जास्त असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्य सरकारने पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा काढण्याची सवलत शेतकऱ्यांना दिल्यानंतर १ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात १ कोटी ६९ लाख ४८ हजार ७९० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. गेल्या वर्षी ५७ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यंदा यात दीडपटीने वाढ होईल असे अपेक्षित होते. त्यानुसार ही संख्या ८५ लाखांपर्यंत जाईल असे वाटत असताना प्रत्यक्षात एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. सुरुवातीला ३१ जुलै ही अंतिम मदत होती, मात्र संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना शेवटच्या दिवशी पीक विमा भरता आला नाही. त्यामुळेच राज्य सरकारने ही मुदत वाढवून देण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती. त्यानुसार ही मुदत ३ ऑगस्टपर्यंत करण्यात आली. त्यामुळे शेवटच्या दिवशी अर्थात ३ ऑगस्टला सुमारे ६ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला.

सर्वाधिक नोंदणी बीड जिल्ह्यात
राज्यात आतापर्यंत सर्वाधिक नोंदणी ही बीड जिल्ह्यातून झाली असून सुमारे १८ लाख ४८ हजार ८८६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यात ११ लाख ९७ हजार ३४ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. नगर जिल्ह्यात ११ लाख ७२ हजार १०४ शेतकऱ्यांनी तर औरंगाबाद जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार ३४४ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. सर्वात कमी रत्नागिरी जिल्ह्यातील १९ हजार ५१५ शेतकन्यांनी नोंदणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ५५ हजार ३०७ शेतकरी तर पालघर जिल्ह्यातील ६६ हजार ४३३ शेतकयांनी नोंदणी केली आहे.

'सार्वजनिक सुविधा केंद्रांमधून शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी ३ ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. मात्र बँकांना त्यांच्या कर्जदार शेतकयांसाठी नोंदणी करण्यासाठी नियमानुसार आणखी पंधरा दिवस दिले जातात. या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही, अशा कर्जदार शेतकयांना या पंधरा दिवसांत बँकेमार्फत पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. १८ ऑगस्ट नंतर मात्र, बँकांना नव्याने शेतकऱ्यांची नोंद करता येणार नाही.'
- विनयकुमार आवटे, कृषी सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण, पुणे

 

Web Title: As many as 1 crore 70 lakh farmers have taken out crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.