सातारा : वातावरण अनुकूल, जमिनीची सुपीकता तर दुसरीकडे विभागानुसार ३०० ते ५ हजार मिलिमीटरपर्यंत पडणारा पाऊस अशा वैविध्यपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यात सुमारे ७ हजार हेक्टरवर तब्बल ४० प्रकारची फळे घेण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंबाची अनेक देशात निर्यात होते. यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्राचे 'फ्रूट बास्केट' म्हणून पुढे येत आहे.
सातारा जिल्ह्याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण हे तालुके दुष्काळीपट्ट्यात मोडतात. याठिकाणी ३०० ते ४०० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. तर पश्चिमेकडील सातारा, जावळी, वाई, पाटण, महाबळेश्वर या भागात पाऊस अधिक असतो.
महाबळेश्वर, कोयनानगर येथे तर जून ते सप्टेंबर दरम्यान ५ हजार मिलिमीटरच्या वर पर्जन्यमान होते. जिल्ह्यात अशी भौगोलिकता आहे. त्यामुळे विविध भागात वेगवेगळी पिके घेण्यात येतात. तसेच फळबागाही घेतल्या जातात. सध्या जिल्ह्यात ४० प्रकारची फळे घेण्यात येतात एवढे वैविध्य जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक फळबागांचे क्षेत्र डाळिंबाचे आहे. त्यानंतर इतर फळे घेण्यात येतात. यातील काही फळे कमी पाऊस पडणाऱ्या भागात होतात. तर काही फळांना पाऊस तसेच हवामान आवश्यक असते. अनुकूल हवामानानुसार फळबागा घेतल्या जातात.
या फळबागांतून शेतकरी मालामाल होऊ लागले आहेत. यातूनच महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी पर्यटन सुरू झाले. तर दुष्काळी भागात कृषी पर्यटनाला गती मिळाली आहे परिणामी बळीराजासाठी हे आशादायक वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे शेतकरी इकडे वळत आहेत.
जिल्ह्यातील फळ लागवड अन् क्षेत्र (हेक्टरमध्ये)द्राक्ष - ६१८डाळिंब - १४००आंबा - १,४८६काजू - १४सीताफळ - ६९०पेरू - ४५०कागदी लिंबू - ६८चिकू - २२७नारळ - १५१बोर - २६आवळा - ४२जांभूळ - २६फणस - २०चिंच - ८२अंजीर - १९संत्री - ०२मोसंबी - ०४सफरचंद - ०३केळी - २७५पपई - ५५ड्रॅगनफ्रूट - ७०स्ट्रॉबेरी - १,०३७कलिंगड - ८१टरबूज - १८रासबेरी - १०गुजबेरी - १०ब्लूबेरी - ०१मलबेरी - २२खजूर - ०२
फळबागांचे होणारे फायदे• फळपिकांत आंतरपीक घेता येते.• कमी पाण्यातही फळबागा घेणे शक्य होते.• शाश्वत उत्पन्नाचा पर्याय निर्माण.• पर्यटनाच्या माध्यमातून अर्थार्जन होऊ शकते.• रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत.• दुष्काळी तालुक्यात पर्यटन, एकाच ठिकाणी अनेक फळबागा.• पर्यटन व्यवसायातून फळांची विक्री.• फळांवर प्रक्रिया उद्योग झाल्यास रोजगार वाढणार.