Join us

अलीकडे गुरांची संख्या झाली कमी झाल्याने; गावागावांतील कोंडवाडे झाले गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:02 PM

शेती करायची झाल्यास बैलांशिवाय शक्य नव्हते. अलिकडच्या काळात मात्र यांत्रिकीकरणात झपाट्याने वाढ झाली आणि बैलांवरील शेतीकामे यंत्राद्वारे होऊ लागली आहेत. त्यामुळे गुरांची संख्या हळूहळू कमी होत आहे. याचाच परिणाम ग्रामीण भागातील कोंडवाडे गायब झाले आहेत. काही गावांत तर कोंडवाड्यांची जागा, इमारतही गिळंकृत करण्यात आल्या आहे.

पूर्वी शेती करायची झाल्यास बैलांशिवाय शक्य नव्हते. अलिकडच्या काळात मात्र यांत्रिकीकरणात झपाट्याने वाढ झाली आणि बैलांवरील शेतीकामे यंत्राद्वारे होऊ लागली आहेत. त्यामुळे गुरांची संख्या हळूहळू कमी होत असून, ग्रामीण भागातील कोंडवाडे गायब झाली आहेत. काही गावांत तर कोंडवाड्यांची जागा, इमारतही गिळंकृत करण्यात आली आहे.

सध्या यांत्रिकीकरण झाल्यामुळे जनावरांची संख्या कमी झालेली आहे. सर्व कामे यंत्र व ट्रॅक्टरने केली जात आहेत. शेतातील पिकांवर ताव मारून नुकसान करणाऱ्या मोकाट जनावरांना आवर घालण्यासाठी पूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक गावांत कोंडवाडे होते.

आता या कोंडवाड्यांची संख्या कमी झालेली आहे. जवळपास सर्वच शेतकरी ट्रॅक्टरने शेतीची कामे करीत आहेत. त्यामुळे जनावरांची संख्या घटलेली आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावरे असायची.

आता जनावरांची देखभाल करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. शिवाय शेतीची कामे करणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. शेतीची कामे करण्यासाठी मजूरही मिळत नाहीत. शेतीची कामे करणे, जनावरे चारणे, यासाठी कमी मजुरी मिळत होती. त्यामुळे या जनावरांना चारण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दावणीची जनावरे विकली आहेत.

तथापि, घटलेल्या पशुधनामुळे आता फारसे कोंडवाड्याचे महत्त्व उरले नाही. त्यामुळे या इमारती इतिहासजमा झाल्याचे दिसते.

पूर्वी शेतकऱ्यांसह मजूरवर्गाकडेही असायची जनावरे

■ पूर्वी ग्रामीण भागात शेतकरीच नव्हे, तर शेतमजुरांकडेही जनावरे मोठ्या प्रमाणात असायची. ज्या गुराढोरांना खाद्य अर्थात चारा, पाणी मिळत नव्हता.

■ पाळीव जनावरे मोकाट फिरून शेतातील पिकांचे नुकसान करीत होती. त्यांच्या बंदोबस्तासाठी गावखेड्यांमध्ये कोंडवाड्याची निर्मिती केली गेली होती.

■ पूर्वी मोकाट जनावरे कोंडवाड्यात टाकली जायची. ग्रामपंचायतीकडे पावती रूपाने योग्य तो कर भरून गुरांचे मालक कोंडवाड्यात कोंडलेल्या आपल्या जनावरांची सुटका करून घेत होते. त्यामुळे ग्रा.पं. च्या करातही भर पडत असे.

हेही वाचा - Animal Care नका होऊ देऊ दुर्लक्ष; पावसाळ्यात विविध आजारांचे असते पशुधनावर लक्ष

टॅग्स :शेतीशेतकरीशेती क्षेत्रदुग्धव्यवसायगायपाणी