तुम्ही राेज खात असलेले रिफाइंड तेल तुमच्या व कुटुंबीयांच्या आराेग्यासाठी सुरक्षित आहे का? याचा विचार करणे गरजेचे आहे. मुळात आपल्या देशात मिळणाऱ्या प्रत्येक रिफाइंड खाद्यतेलात किमान ६० ते ६५ टक्के पामतेलासाेबत सिंगल रिफाइंडमध्ये सात आणि डबल रिफाइंडमध्ये १४ रसायने मिसळली जातात. पामतेलासाेबत ही रसायने मानव आराेग्याच्या दृष्टीने घातक व विविध आजारांना निमंत्रण देणारी आहेत, अशी माहिती केमिस्टसह तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिली.
या अशा भेसळीमुळे शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या तेलबियांमध्ये पुढे मात्र भेसळ होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यातून शेतकरी आणि ग्राहक दोघांचीही पैशांच्या फायद्यासाठी फसवणूक होत असल्याचे दिसत आहे.भारत खाद्यतेल उत्पादनात आता परावलंबी झाला आहे. खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी एकूण उत्पादनाच्या ६५ ते ६८ टक्के तेल आयात केले जाते. यात ६६ टक्के पामतेलाचा समावेश आहे. भारतात रिफाइंड तेलाची निर्मिती ३० वर्षांपूर्वी करण्यात आली. रिफाइंड तेल तयार करण्यासाठी पामतेलाचा ‘ब्लेंडिंग’ म्हणून वापर केला जातो. या पामतेलात आधीच डालडा व चरबीचा वापर केला जाताे. केमिकल्स वापरल्याशिवाय तेल रिफाइंड होत नाही.सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक अँटी ऑक्सिडंटस्, हेक्सेन यासह एकूण सात तर डबल रिफाइंडमध्ये १४ घातक केमिकल्स वापरली जात असल्याने त्याचा वास येत नाही व चिकटपणा नष्ट हाेताे. त्यात काेणतेही प्रोटीन, फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ‘ई’ व मिनरल्स तसेच मानवी आराेग्याला आवश्यक असलेले घटक शिल्लक राहत नाही. जे लाेकं कडक उपवास करतात व खनिज मीठ वापरतात त्यांनी तळण्यासाठी चुकूनही रिफाइंड तेल वापरू नये, असा सल्लाही डाॅक्टर देतात.‘हार्ट अटॅक’ला निमंत्रणपामतेल व केमिकल्समिश्रित रिफाइंड तेलामुळे मानवी शरीरात काही घातक घटक तयार होतात. त्याला एल. डी. एल. (लाे डेन्सीटी लिपोप्रोटीन) म्हणतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजस् तयार होऊन हार्ट अटॅकचा धाेका संभवताे. वात विकार असंतुलित राहताे. साेबतच गंभीर आजार उद्धभवतात, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली.उकळलेल्या तेलात विषारी घटकया खाद्यतेलाला रिफाइंड करताना पहिल्यांदा ३०० ते दुसऱ्यांदा ४६४ डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. तेल एकदा उकळले तर ते पुन्हा खाण्यायोग्य राहत नाही. डबल व ट्रिपल रिफाइंड करताना हे तेल दोनदा व तीनदा उकळल्याने त्यात काही विषारी घटक तयार हाेतात. या तेलाची घनता कमी असल्याने त्याच्या वापरासाेबतच खर्चही वाढताे.