Lokmat Agro >शेतशिवार > वयाच्या ७५ व्या वर्षी हवामानतज्ञ डॅा रामचंद्र साबळे यांनी पूर्ण केला आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम

वयाच्या ७५ व्या वर्षी हवामानतज्ञ डॅा रामचंद्र साबळे यांनी पूर्ण केला आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम

At the age of 75, meteorologist Dr Ramchandra Sable completed an international standard course | वयाच्या ७५ व्या वर्षी हवामानतज्ञ डॅा रामचंद्र साबळे यांनी पूर्ण केला आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम

वयाच्या ७५ व्या वर्षी हवामानतज्ञ डॅा रामचंद्र साबळे यांनी पूर्ण केला आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम

साऊथ एशियन मेटरॉलॉली असोसिएशन अंतर्गत ८० देशांच्या हवामान शास्त्रज्ञांमध्ये भारतातून डॉ साबळे यांची उपस्थिती

साऊथ एशियन मेटरॉलॉली असोसिएशन अंतर्गत ८० देशांच्या हवामान शास्त्रज्ञांमध्ये भारतातून डॉ साबळे यांची उपस्थिती

शेअर :

Join us
Join usNext

जेष्ठ हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी सॅटलाइट मेटरॉलॉजी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याबद्दल त्यांचा प्रशस्तीप्रत्र देऊन सन्मान करण्यात आला. या अभ्यासक्रमात ८० देशातील हवामान शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता.

साऊथ आशिया मेटरॉलॉजी असोसिएशन आणि बिर्ला इन्स्टीट्यूट यांनी संयुक्तपणे 'उपग्रह हवामानशास्त्र' या अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. या अंतर्गत २ सप्टेंबर ते ३ फेब्रुवारीदरम्यान सहभागी झालेल्या हवामान शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले. 

इस्रोकडून उपग्रह हवामान सेवा दिली जाते. या उपग्रहांवरून साधारण १५ मिनिटांच्या अंतरावर छायाचित्र घेण्यात येतात. त्या छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या भागात ढगांची काय स्थिती आहे? कुठे कसापाऊस पडू शकतो. कोणत्या भागात पावसाला पोषक वातावरण तयार होईल अशा प्रकारची माहिती या छायाचित्रांवरून आपल्याला मिळू शकते. 

या उपग्रहाच्या अधुनिक तंत्रज्ञानामुळे वादळ वारे नक्की कोणत्या भागात सक्रीय आहे, कुठे विजांचा कडकडाट होत आहे? अशा प्रकारची ताजी माहिती मिळून अंदाज लावणं सोपं होते. परिणामी आपत्कालिन परिस्थितीचा अंदाज लावणे अशा अनेक बाबींचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमाअंतर्गत देण्यात आले आहे.

८० देशातील प्रतिनिधी

या प्रशिक्षणासाठी जगभरातून ८० देशांमधील हवामान शास्त्रज्ञ, अभ्यासक सहभागी झाले होते. भारतातून डॉ रामचंद्र साबळे यांनी सहभाग घेतला होता. हवामान शास्त्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हे प्रशिक्षण होते. हवामान अंदाज देणाऱ्या संस्थांमधील उत्सूक शास्त्रज्ञ यात उपस्थित होते. 

शेतकऱ्यांसाठी अद्ययावत हवामान अंदाज देणे होणार शक्य

वातावरणीय आणि पर्यावरणीय विज्ञान असा ४ महिन्यांचा अभ्यासक्रम प्रथम मी पूर्ण केला. यात उत्कृष्ट दर्जा मिळाला असून आता रडार हवामानाचा एका अभ्यासक्रमही मी करणार आहे.या अभ्यासक्रमामुळे शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अचूक व अद्ययावत अंदाज देणे शक्य होणार आहे. असे डॉ साबळे म्हणाले.

 

 

Web Title: At the age of 75, meteorologist Dr Ramchandra Sable completed an international standard course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.