Lokmat Agro >शेतशिवार > Atal Bamboo Samriddhi Yojana : राज्यात होणार अर्बन फॉरेस्ट हब !

Atal Bamboo Samriddhi Yojana : राज्यात होणार अर्बन फॉरेस्ट हब !

Atal Bamboo Samriddhi Yojana: Urban Forest Hub to be held in the state! | Atal Bamboo Samriddhi Yojana : राज्यात होणार अर्बन फॉरेस्ट हब !

Atal Bamboo Samriddhi Yojana : राज्यात होणार अर्बन फॉरेस्ट हब !

Atal Bamboo Samriddhi Yojana : राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर होणार बांबू लागवड होणार आहे. पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषद संपन्न.

Atal Bamboo Samriddhi Yojana : राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर होणार बांबू लागवड होणार आहे. पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषद संपन्न.

शेअर :

Join us
Join usNext

Atal Bamboo Samriddhi Yojana : 

वातावरण बदलाचा आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा उत्तम पर्याय आहे. येत्या काळात राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे आज पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.  सध्या निसर्ग चक्र बदलत असून अवकाळी, गारपीट, अतिवृष्टी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हे सर्व पर्यावरणात बदलामुळे होत आहे. यावर पर्यावरणाचे संवर्धन हा एकमेव उपाय आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी झाले आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांबू लागवड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 
बांबूमध्ये पर्यावरण समतोल राखण्याची प्रचंड क्षमता आहे. एक बांबू ३२० किलो प्राणवायू निर्माण करते. कार्बनचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतो. इतर वृक्षांच्या तुलनेत ३० टक्के जास्त कार्बन बांबू शोषतो. 
बांबू लागवडीतून शेतकऱ्यांनाही फायदा होतो. त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी मदत होते. ऊसापेक्षा बांबू लागवड जास्त फायदेशीर आहे. बांबूपासून विविध उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल.
शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आणि पर्यावरणाच्या फायद्याच्या अनेक योजना शासन राबवत असून जलयुक्त शिवारही अशीच एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे.
राज्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प शासन राबवत आहे. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर सी लिंक असे प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. हे विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाची योग्य ती काळजी घेतली जात आहे. 

अर्बन फॉरेस्ट होणार
* शहरी भागातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे मुंबईतील प्रदूषणाचा निर्देशांक ३५० वरून ८० ते ११० पर्यंत कमी झाला आहे. 
* शहरी भागातील प्रदूषण रोखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट तयार करण्यात येत आहे. पश्चिम आणि पूर्व या दोन्ही द्रुतगती मार्गांच्या दोन्ही बाजूला बांबू लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. 
* राज्यातील सर्व महामार्गाच्या दुतर्फा बांबू लावण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. बांबू हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे. 
* जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळावे. आज बांबूची मागणी मोठी आहे. पण उत्पादन कमी आहे. बायोमास म्हणून ही बांबूचा उपयोग होतो. त्यापासून इथेनॉल निर्मिती होते, औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये इंधन म्हणून बांबूचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. 
* त्यामुळे भविष्यात बांबूला मोठी मागणी असणार आहे. बांबू पिकाचा समावेश मनरेगामध्ये करण्यात आला आहे. बांबू लागवडीसाठी प्रती हेक्टरी ७ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या या पिकाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहनही मुख्यमंत्री यांनी केले. 
* कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत  पटेल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री यांच्यामुळे आज महाराष्ट्रात बांबूला राजाश्रय मिळाले आहे. त्यांच्या प्रयत्नातून राज्यात मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड होत आहे. या शिखर परिषदेस जगभरातील संशोधक आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपस्थित शेतकऱ्यांना फायदा होईल. 


कार्यक्रमांप्रसंगी व्यासपीठावर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोदरेज उद्योग समूहाचे नादिर गोदरेज, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव सचिव अनुप कुमार, वन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रुपाली देशपांडे यांनी केले.

Web Title: Atal Bamboo Samriddhi Yojana: Urban Forest Hub to be held in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.