Join us

Ativruti Nuksan Bharpai : दीड महिन्यात शेतीमालाचे नुकसान; २५२ कोटी रुपयांची शासनाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:02 AM

मागील दीड महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाले वाचा सविस्तर (Ativruti Nuksan Bharpai)

Ativruti Nuksan Bharpai : 

छत्रपती संभाजीनगर:  मागील दीड महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टरवरील शेतीमालाचे नुकसान झाले होते. ऐन दिवाळीत काढणीला आलेले पीक हातचे गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती कक्षाकडून २५२ कोटी ७८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी कृषी विभागाने शासनाकडे प्रस्तावाद्वारे केली आहे.

या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. १ ते ३ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यानंतर २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान वैजापूर तालुका वगळता जिल्ह्यातील अन्य आठ तालुक्यात अवकाळी पाऊस पडला.या पावसांत १३ हजार ६६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर ११ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत खुलताबाद, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, सोयगाव, कन्नड आणि फुलंब्री तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाली.यात १ लाख ४३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना २३४ कोटी २० लाखांची नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने शासनास पाठविला आहे.

एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाई मिळावीनैसर्गिक आपत्तीत शेतीमालाचे नुकसान झाल्यानंतर दोन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याचा राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती विभागाचा नियम आहे. या निकषानुसार कृषी विभागाने शासनाला प्रस्ताव पाठवून नुकसानभरपाई देण्यासाठी निधीची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसशेतकरीशेती