आधीच भाव मिळत नसल्याने कोंडीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. निर्यात शुल्कामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव थांबवल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील विंचूर उपबाजार समितीत आज 536 नगांच्या उन्हाळी कांद्याचा लिलाव करण्यात आला.
विंचूर उपबाजार समितीत गुरुवारी एकूण 1027 नग कांद्याची आवक झाली असून एकूण कांदा 18 हजार क्विंटल एवढा होता. कांद्याला किमान 900 रुपये ते 2560 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी संतप्त होत लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद केल्यानंतर काल कांद्याची आवक 4892 क्विंटल एवढी झाली. उन्हाळी कांद्याला सरासरी 2151 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. तर पिंपळगाव व सायखेडा उपबाजार समितीत 433 व 253 नग कांदा आला होता. ज्याचा सरासरी 2021 रुपयांनी लिलाव करण्यात आला.
निफाड मध्ये एकूण 277 एकूण नग उन्हाळी कांदा आला होता. किमान 900 रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याचा लिलाव झाला असून सरासरी 2050 रुपयांपर्यंत विक्री करण्यात आली. पहिल्या सत्रात हा लिलाव झाला असून दुपारी तीन नंतर पुढचे लिलाव सुरू झाले आहेत.