महाराष्ट्र राज्यामध्ये वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना “महाराष्ट्र वनभूषण" पुरस्कार प्रदान करण्याचे शासनाने ठरविले आहे. वनक्षेत्रामध्ये जैव विविधता संगोपन, वन्यजीव संवर्धन, वनसंरक्षण, मृद व जलसंधारण, दस्तऐवजीकरण, वनेतर क्षेत्रामध्ये वनीकरण इत्यादि क्षेत्रांमध्ये नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर करणे.
त्याद्वारे लोकजागरण करणे, लोक चळवळ उभारणे अशा प्रकारची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन निर्णय जारी केला आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणा-या व्यक्तींना "महाराष्ट्र वनभूषण" पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
पुरस्कार स्वरुपरु.२० लक्ष रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र.
पुरस्कारासाठीचे निकषराज्यातील वन व वानिकी क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीची पुढील निकषानुसार निवड करण्यात येईल.१) गैरसरकारी संसाधनांचा वापर करुन लोकजागर व लोकचळवळीच्या माध्यमातून वन व वानिकी क्षेत्रामध्ये जसे की, जैवविविधता संगोपन, वनसंवर्धन, वन्यजीव संवर्धन, मृद व जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचा पर्याप्त वापर, पर्यावरण सजगता, महत्वाचे दस्तऐवजीकरण, वनेतर क्षेत्रामध्ये वनीकरण इत्यादि विविध शाखांमध्ये उल्लेखनीय कार्य असावे.२) उपरोक्त शाखांमधील कार्यामुळे लोकचळवळीद्वारे वनसंवर्धनासाठी असाधारण योगदान दिलेले असावे.३) सदरहू पुरस्काराकरिता कार्यरत शासकीय/निमशासकीय/अनुदानित/स्थानिक स्वराज्य संस्था यांमधील अधिकारी/कर्मचारी पात्र नसतील. याशिवाय सदर व्यक्तीचे चारित्र्य निष्कलंक व सचोटी निर्विवाद असणे आवश्यक आहे. ती व्यक्ती महाराष्ट्र राज्याची अधिवासी असावी.