Join us

Ayodhya Ram Mandir: अयोध्यातील श्रीराम प्रतिष्ठापनेसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा गुलाब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 7:01 PM

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्री रामाच्या मूर्तीचा आज प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असून त्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे ५० ते ६० हजार गुलाब गुच्छ गेल्याची माहिती आहे.

अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोमवारी होणार असून याचा उत्साह संपूर्ण देशभरात पसरला आहे. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी देशभरातून आणि जगभरातून वेगवेगळ्या जातीच्या फुलांची सजावट नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात केली आहे. त्याचबरोबर राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून फुले आणि झाडे आयोध्येला पोहचले आहेत.

दरम्यान, देशाच्या विविध कोण्यातून विवध फुले सजावटीसाठी अयोध्येत पोहेचली असून महाराष्ट्रातून तब्बल ५० ते ६० हजार गुलाबांच्या फुलांचे गुच्छ आयोध्येला पोहचले आहेत. त्याचबरोबर अँथोरिअम फुले दक्षिण भारतातून आयोध्येत पोहचली असून झेंडू आणि इतर फुले उत्तरप्रदेशमधील शेतकऱ्यांची असल्याची माहिती समोर आली आहे. 

महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी अयोध्येला फुले पाठवत असून यामुळे बाजारात होणारी आवक कमी झाली आहे. काल मुंबई मार्केटमध्ये जवळपास ३० ते ४० टक्के फुलांची आवक कमी झाली होती. रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यामुळे मागणी जास्त आणि आवक कमी झाल्याने बाजारात फुलांचे दर वाढले होते. तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

महाराष्ट्रातून सात हजारांहून अधिक झाडे

आयोध्येतील नव्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून तब्बल ७ हजारांपेक्षा अधिक कुंड्यात लावलेली झाडे पोहोच झाली असून कार्यक्रमासाठी त्याची सजावट केली जाणार आहे. या झाडांमध्ये वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलझाडांचा सामावेश आहे. 

अयोध्येत होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अंदाजे ५० ते ६० हजार गुलाबांच्या फुलांचे गुच्छ आयोध्येला पोहचले आहेत. त्याचबरोबर इतर फुले बाकीच्या राज्यातून नेली असून महाराष्ट्रातून सर्वांत जास्त गुलाब आयोध्येला गेला आहे. 

- धनंजय कदम (जनरल मॅनेजर, फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडिया)

टॅग्स :अयोध्याशेती क्षेत्रशेतकरीफुलशेतीफुलं