विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 'घंटो का काम मिनिटो में' करणारे ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. ड्रोन यंत्राद्वारे फवारणी योजना महिला बचत गट आणि शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून विशेष अनुदान देऊन राबवली जाणार आहे. महिला बचत गटांना विशेष अनुदानातून ५ लाखांचे ड्रोन फवारणी यंत्र ५० हजारांत दिले जाणार आहे. शिरूर तालुक्यातील बारगज वाडी येथे सोमवारी ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे.
२२ डिसेंबरपासून तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विकास रथातील व्हिडीओ क्लिपद्वारे फवारणी कशी केली जाते, याची माहिती दिली. शिरुर कासार तालुक्याील बारगजवाडी येथील शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविताना गटविकास अधिकारी संजय केंद्रे आदी. जाते. पाठीवरील फवारणी यंत्रामुळे लागणारा वेळ व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची ड्रोन फवारणी यंत्रामुळे कायमची सुटी होणार आहे.
पाण्याची होणार बचत
कमी पाण्यात, कमी औषधीत तसेच अत्यल्प वेळेत ही फवारणी होणार आहे. एकरभर फवारणीसाठी अवघ्या दहा लिटर पाण्याची गरज असते. यामुळे जास्तीचे पाणी आणि औषधीची देखील बचत होणार आहे. महिला बचत गट व शेतकरी बचत गटाला पाच लाखांचे ड्रोन फवारणी यंत्र अवघ्या पन्नास हजारांत मिळणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी दिली. प्रात्यक्षिक दाखविताना सुनील शिंदे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मिसाळ व शेतकरी होते.
२० जानेवारीपर्यंत दाखविणार प्रात्यक्षिके
तालुक्यातील मातुरी, लिंबा, शिरापूर गात, कमळेश्वर धानोरा, घोगस पारगाव, माळेगाव, फुलसांगवी, तितरवणी, तरडगव्हण, हाजीपूर, खालापुरी, जांब, पौंडूळ या गावातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी २० जानेवारीपर्यंत प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी सांगितले.