Lokmat Agro >शेतशिवार > Balipratipada Padwa : बलीप्रतीपदा म्हणजे नक्की काय? आणि या दिवशीची काय आहे प्रथा

Balipratipada Padwa : बलीप्रतीपदा म्हणजे नक्की काय? आणि या दिवशीची काय आहे प्रथा

Balipratipada Padwa : What exactly is Balipratipada? And what is the custom of this day | Balipratipada Padwa : बलीप्रतीपदा म्हणजे नक्की काय? आणि या दिवशीची काय आहे प्रथा

Balipratipada Padwa : बलीप्रतीपदा म्हणजे नक्की काय? आणि या दिवशीची काय आहे प्रथा

आजही "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" म्हणत महाराष्ट्राबरोबरच केरळात आणि तुळू प्रदेशातही महाबळीच्या स्वागतार्थ घरे सजवली जातात आणि अंगणात मोठमोठ्या 'पूकळम्' (फुलांच्या रांगोळ्या) काढण्याचा आणि दीपोत्सव करण्याचा प्रघात आहे. बळीच्या गौरवार्थ लोकगीते म्हणण्याचीही प्रथा काही भागात आहे.

आजही "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" म्हणत महाराष्ट्राबरोबरच केरळात आणि तुळू प्रदेशातही महाबळीच्या स्वागतार्थ घरे सजवली जातात आणि अंगणात मोठमोठ्या 'पूकळम्' (फुलांच्या रांगोळ्या) काढण्याचा आणि दीपोत्सव करण्याचा प्रघात आहे. बळीच्या गौरवार्थ लोकगीते म्हणण्याचीही प्रथा काही भागात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तीन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे. हा सण मुळात कृषी संस्कृतीतून आलेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करायची प्रथा आहे. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. बळीची प्रार्थना केली जाते.

या दिवसाला 'दिवाळी पाडवा' असे देखील म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. विक्रम संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ह्या दिवशी सर्वांनी पहाटे अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत अशी पूर्वापार चालत आलेली रीत आहे. ह्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची, तसेच त्यावेळी पतीने आपल्या एखादी भेटवस्तू ‘ओवाळणी’ म्हणून देण्याची एक गोड प्रथा आजही घराघरांमधून आवर्जून पाळली जाते. 

बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही त्याने पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो.

काय आहे आख्यायिका?

शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात आणि एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात आणि ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत्सर सुरू होतो. 

हेही वाचा : Farmer Success Story : शेतकऱ्याने झेंडू शेतीतून साधले अर्थकारण; तीन महिन्यांत मिळाले तीन लाखांचे उत्पन्न

Web Title: Balipratipada Padwa : What exactly is Balipratipada? And what is the custom of this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.