Join us

शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी बळीराजा हेल्पलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 2:00 PM

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी किंवा तक्रारी आता 'बळीराजा हेल्पलाइन' नंबरद्वारे करता येणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रलंबित कामांसाठी पोलीस ठाण्यात किंवा इतर कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी किंवा तक्रारी आता 'बळीराजा हेल्पलाइन' नंबरद्वारे करता येणार आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक कामांसाठी पोलिस ठाण्यात व इतर कार्यालयांमध्ये जावे लागते. बऱ्याचदा आपले काम कुणाकडे प्रलंबित आहे, याची माहितीदेखील त्यांना मिळत नसल्याने त्यांना अकारण प्रवास सोसावा लागतो. त्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात असल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांनी शेतकऱ्यांसाठी आता ६२६२ (७६) ६३६३ ही नवीन बळिराजा हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 

ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेली ही हेल्पलाईन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी भावना त्यांनी व्यक्त करत पालकमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते हेल्पलाईन सुरु करण्यात आली. यावेळी पालकमंत्री भुसे यांच्यासमवेत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे उपस्थित होत्या.

वारंवार घडणाऱ्या  शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना घडत असताना  शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने लाखो रुपयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागते. आता बळीराजा हेल्पलाइनच्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध  होणार असून शेतकऱ्यांच्या  समस्या सोडवण्यासाठी  नाशिक ग्रामीण पोलीस दल कटिबद्ध असून, शेतकरी बांधवांनी आपल्या तक्रारी सदर हेल्पलाईनचे माध्यमातून मोकळेपणाने मांडाव्यात असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीनाशिकशेती