Bamboo Day Special :
गेल्या काही वर्षापासून शेतकरी आता नावीन्यपूर्ण प्रयोग करताना दिसत आहेत. त्यामुळे आता हवामान बदल लक्षात घेऊनच नवीन प्रयोग करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आता वाढताना दिसतो आहे.
आता राज्यातील शेतकरी आता बांबू शेतीकडे वळताना दिसत आहेत. आज (१८ सप्टेंबर) जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त या शेतीच्या तंत्र आणि मंत्र या विषयी माहिती घेऊ या.
आजकाल शेतकरी ज्या पद्धतीने शेतीच्या नवीन पध्दतींचा अवलंब करीत आहेत तशाच शेतीच्या नवीन पद्धती आपणही अवलंबायला हव्यात. पारंपारिक पिके सोडून बांबूची लागवड शेतकऱ्यांसाठी एक चांगली कल्पना असू शकते.
या शेतीत आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो, परंतु त्यानंतर आपण त्यातून चांगले पैसे कमवू शकतो. आता बांबू लागवडीचे नियम पूर्वीपेक्षा बरेच सोपे झाले आहेत, अशा परिस्थितीत आपण त्याचा लाभ घेऊ शकता.
बांबू शेतीमध्ये लाखोंचे उत्पन्न कसे?
बांबूची लागवड करुन आता शेतकरी कोट्यवधींची कमाई करू शकतात. त्यासाठी आता शासनाने मोठ्या प्रमाणात शेतीसाठी ''राष्ट्रीय बांबू मिशन'' देखील तयार केले आहे.
त्याअंतर्गत बांबूच्या लागवडीसाठी शेतकर्याला प्रति रोप या प्रमाणे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
शासनाने ''या'' कायद्यात केले बदल
जानेवारी २००१८ मध्ये केंद्र सरकारने बांबू झाडांच्या श्रेणीतून काढून टाकले. तथापि, हा कायदा केवळ खासगी जमिनीसाठी केला गेलाय. जंगलभूमीवर बांबूंना कोणतीही सूट नाही. तेथे वन कायदा लागू होईल.
बांबू शेतीचा प्रकार कोणता?
बांबूची लागवड ही केवळ एक हंगामातील शेती नसून त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. बांबूच्या शेतीसाठी सुमारे ४ वर्ष लागतात. चौथ्या वर्षी त्याची कापणी होते. बांबूची रोपे काही मीटर अंतरावर लावली जातात.
शेतकरी बांबू लागवडीबरोबरच काही इतर पिके घेऊ शकतात. तीन वर्षांत प्रत्येक झाडाची सरासरी किंमत २४० रुपये असेल. त्यापैकी सरकार शेतकऱ्यांना मदत करते आणि बांबूच्या लागवडीसाठी प्रति झाड १२० रुपये मदत मिळते.
बांबू शेतीचा मंत्र
शेती सुरु करण्यापूर्वी तुम्हाला बांबूच्या वाणांची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे बांबू लावायचे आहेत आणि आपण ते बाजारात कसे विकणार आहोत याचे तंत्र अवगत करावे लागेल. वास्तविक, बांबूच्या १३६ प्रजाती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यामुळे मार्गदर्शनातून माहिती मिळते.
काय आहे कमाईचे गणित?
जर आपण ३ x २.५ मीटर अंतरावर एक रोप लावले तर सुमारे एक हेक्टर क्षेत्रात १५०० झाडे लावली जातात.
दोन झाडांच्या अंतरामध्ये आपण दुसरे पीक घेऊ शकतो.
४ वर्षानंतर शेतकऱ्यांना साडे तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
दरवर्षी प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता नाही. कारण बांबूची लागवड एकदा केल्यावर सुमारे ४० वर्षे टिकते.
अटल बांबू समृद्धी योजना काय
महाराष्ट्र शासनाने दि. २८ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयान्वये, जुनी अटल बांबू समृद्धी योजना रद्द करून "नवीन अटल बांबू समृद्धी योजना" मंजूर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून," अटल बांबू समृद्धी योजना "अंतर्गत चालू वर्षी (2024 चा पावसाळा ) बांबू लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची गुगल फॉर्म लिंक यासोबत देण्यात येत आहे. तरी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने तात्काळ सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अटल बांबू समृद्धी योजना शेतकऱ्यांना आधार देणारी आहे. या योजेनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह, नोंदणीकृत संस्था आदी सभासदांनी एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर खाजगी शेतकऱ्यांकडून एक एकट्या शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाईल.
हे कागदपत्र आवश्यक
ऑनलाइन अर्ज सादर करताना अर्जासोबत आधार कार्ड, नवीन सातबारा उतारा, बँक पासबुकचे पहिले पानाची झेरॉक्स किंवा कॅन्सल केलेला चेक आदी कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक राहील.