Join us

Banana Crop Management : केळी उत्पादक शेतकऱ्यांना बागेचे 'हे' हरित कुंपण देतंय दुहेरी फायदा

By रविंद्र जाधव | Published: October 12, 2024 5:30 PM

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी बागेला नेपियरचे हरित संरक्षण केले आहे. ज्याविषयी उत्पादक शेतकरी सांगतात, केळी (Banana) बागेतील उत्पादन वाढवण्यासाठी हरित कुंपण (Green Fetch) अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात उष्ण वारे (Heat Wave) बागेतील झाडांना गंभीर नुकसान पोहचवू शकतात.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याच्या देवगाव परिसरात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन घेतले जाते. दरम्यान या परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी बागेला नेपियरचे हरित संरक्षण केले आहे. ज्याविषयी उत्पादक शेतकरी सांगतात, केळी बागेतील उत्पादन वाढवण्यासाठी हरित कुंपण अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात उष्ण वारे बागेतील झाडांना गंभीर नुकसान पोहचवू शकतात.

तेव्हा नेपियर गवताचे कुंपण या वाऱ्यांना थांबवते ज्यामुळे केळीच्या झाडांना हरित संरक्षण मिळते. तसेच या कुंपणामुळे मातीची गाळणी कमी होते जलधारण क्षमता वाढते या सर्व गोष्टी बागेतील उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

यासोबतच या नेपियर पासून केळी बाग काढल्यानंतर नेपियर गवताचा मुरघास करून पशुधनासाठी उत्कृष्ट चारा मिळतो. ज्यामुळे या हरित संरक्षणाचा शेतकरी बांधवांना दुहेरी फायदा होत आहे. नेपियर गवत पौष्टिकतेने समृद्ध असल्याने आणि जनावरांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषण प्रदान करत असल्यामुळे दुभत्या गाईंच्या दुधात वाढ देखील बघावयास मिळते. त्यामुळे या नेपियर कुंपणाने दुहेरी फायदा होत असल्याचे शेतकरी राहुल शिंदे सांगतात. 

केळी बागेला हरित कुंपणाची का असते गरज ?

केळी बागेला हरित कुंपणाची गरज असते कारण हे कुंपण बागेला वाऱ्यांपासून, जास्त ऊन आणि अन्य वातावरणीय संकटांपासून संरक्षण करते. हे संरक्षण केवळ झाडांच्या आरोग्यासाठी नाही तर त्याच्या उत्पादनासाठीही महत्त्वाचे आहे.

पशुधनाला नेपियर का आहे गरजेचे ?

नेपियर गवत जनावरांना फायदेशीर आहे कारण यामध्ये उच्च पोषण मूल्य आहे. जनावरांना आवश्यक पोषक तत्वे मिळवून देण्यास हे गवत मदत करते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाच्या आरोग्यासाठी कमी खर्चात उत्तम चारा मिळतो, जो त्यांच्या व्यवसायाला चालना देतो. 

 

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकेळीनेवासाअहमदनगरशेतीफलोत्पादनदुग्धव्यवसाय