Lokmat Agro >शेतशिवार > Banana Cultivation : उसाच्या वाताहतीमुळे केळीचा पर्याय; शेतकऱ्यांना सोयीचा वाटतोय

Banana Cultivation : उसाच्या वाताहतीमुळे केळीचा पर्याय; शेतकऱ्यांना सोयीचा वाटतोय

Banana Cultivation : Farmers feel comfortable with Banana Cultivation | Banana Cultivation : उसाच्या वाताहतीमुळे केळीचा पर्याय; शेतकऱ्यांना सोयीचा वाटतोय

Banana Cultivation : उसाच्या वाताहतीमुळे केळीचा पर्याय; शेतकऱ्यांना सोयीचा वाटतोय

पारंपरिक पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आता तालुक्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे. (Banana Cultivation)

पारंपरिक पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आता तालुक्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे. (Banana Cultivation)

शेअर :

Join us
Join usNext

Banana Cultivation :

एस.आर. मुळे :
 
शिरूर अनंतपाळ :
पारंपरिक पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आता तालुक्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत विविध गावांतील अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे.

त्यामुळे यंदा तालुक्यात १०० एकरांवर केळीची लागवड झाली असून, अद्यापही अनेक गावांत केळीची लागवड सुरूच आहे. शिरूर अनंतपाळ प्रकल्पाचा तालुका असून, घरणी, साकोळ, पांढरवाडी प्रकल्प तसेच डोंगरगाव बॅरेज भरले असल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच तालुक्यातील विविध गावांतील अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग लागवडीकडे वळले आहेत.

शेतकरी यंदा केळी लागवडीला मोठी पसंती देत आहेत. त्यामुळे शेतशिवारात आता उसाऐवजी केळीचे पीक दिसणार आहे. तालुक्यातील धामणगाव, साकोळ, सांगवी घुग्गी, तिपराळ, सुमठाणा, येरोळ, दैठणा, उजेड, डोंगरगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली आहे.  

शंभर एकरांवर केळीची लागवड झाली असली तरी अद्यापही लागवड सुरूच असल्याने भविष्यात केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण खताळ यानी सांगितले.

शिरुर अनंतपाळ तालुक्यात यंदा चांगला पाऊस असल्याने शेतकऱ्यांचा केळी लागवडीकडे कल वाढला आहे. कृषी विभागाकडूनही मार्गदर्शन करण्यात येत आहे.

धामणगावात ४० एकरांवर लागवड

घरणी मध्यम प्रकल्पाशेजारी असलेल्या उसाच्या पट्ट्यातील धामणगावात यंदा सर्वाधिक केळीची लागवड झाली आहे. ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर केळी लावण्यात आली असल्याचे सेवानिवृत मुख्याध्यापक शेतकरी चंद्रकांत कोरे यांनी सांगितले.

उसापेक्षा केळीचा हंगाम लवकर सुरू होतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जी-९ या जातीच्या केळीची लागवड केली आहे. लागवडीचा खर्च उसापेक्षा जास्त म्हणजे एकरी एक लाख होत असला तरी, केवळ अकरा महिन्यांत पाच लाखांचे उत्पादन अपेक्षित आहे. एकरी तीन ते चार लाखांचा नफा मिळू शकतो, असे केळी उत्पादक शेतकरी सुनील कोरे यांनी सांगितले.

उसाच्या वाताहतीमुळे केळीचा पर्याय

* उसाची लागवड केल्यापासून ऊस वेळेत कारखान्याला जावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते. परंतु पंधरा महिन्यांनंतर ऊस कारखान्याला नेला जातो. त्यामुळे उसाची मोठी वाताहत होऊन प्रत्यक्षात टनेजमध्ये घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

* शेतकऱ्यांनी केळीचा पर्याय निवडला असल्याचे धोंडीराम कारभारी, विठ्ठलराव पाटील यांनी सांगितले. पारंपरिक शेती दिवसेंदिवस तोट्यात चालली असून, फळबागेची लागवड ही काळाची गरज असल्याचे नानाजी बोळंगे, संजीव गुणाले, अंगद बोळंगे, प्रभाकर कोरे, अशोक बोळंगे यांनी सांगितले. शिरूर अनंतपाळ तालुक्यात ऊसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, तरीही शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत.

Web Title: Banana Cultivation : Farmers feel comfortable with Banana Cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.