Lokmat Agro >शेतशिवार > Banana Export : सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी; ९ हजार कोटींची बाजारपेठ

Banana Export : सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी; ९ हजार कोटींची बाजारपेठ

Banana Export : Big opportunity in Russia for banana export from Solapur district; Market worth Rs 9 thousand crores | Banana Export : सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी; ९ हजार कोटींची बाजारपेठ

Banana Export : सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी; ९ हजार कोटींची बाजारपेठ

सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी असून अरब देशांतील बाजारपेठेवर अवलंबून न राहता भविष्यात या ९ हजार कोटींच्या पर्यायी बाजारपेठेचा विचार केला जाऊ शकतो.

सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी असून अरब देशांतील बाजारपेठेवर अवलंबून न राहता भविष्यात या ९ हजार कोटींच्या पर्यायी बाजारपेठेचा विचार केला जाऊ शकतो.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी असून अरब देशांतील बाजारपेठेवर अवलंबून न राहता विविश बाजारपेठांचा विचार करणे आवश्यक आहे.

भविष्यात या ९ हजार कोटींच्या पर्यायी बाजारपेठेचा विचार केला जाऊ शकतो, असे प्रतिपादन कंदर, ता. करमाळा येथील केळी निर्यातदार किरण डोके यांनी रशिया दौऱ्यावरून आल्यानंतर केले.

आपेडाच्या वतीने भारतीय निर्यात श्रेणीतील खाद्य पदार्थाची विक्री व व्यवसाय संधीसाठी आयोजित रशिया दौऱ्यातील व्यापारी शिष्टमंडळात केळी निर्यातदार प्रतिनिधी म्हणून किरण डोके सहभागी झाले होते.

मॉस्को येथे दोन दिवस चाललेल्या द्विपक्षीय बैठक व चर्चेत सहभागी होऊन प्रतिनिधींनी विविध करार केले. यावेळी अनेक रशियन व्यावसायिकांनी केळी खरेदीसाठी रस दाखवला. यावेळी काही करार करण्यात आले.

सध्या आपल्या देशातील केळी मुख्यतः अरब देशांमध्ये निर्यात होतात. त्या ठिकाणी मिळणारा दर व रशियामध्ये मिळणारा दर यामध्ये फरक असून ८ ते ९ हजार कोटींची बाजारपेठ उपलब्ध होऊन त्याचा फायदा भारतीय केळी उत्पादकांना होऊ शकतो.

यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना रशियासह देशातील अन्य बाजारपेठेमध्ये मागणी वाढत आहे.

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना दिलासा.
रशियामध्ये भारतीय केळीला चांगला दर मिळू शकतो, परंतु जास्त दिवस टिकणाऱ्या व साल जाड असलेल्या नवीन व्हरायटीची लागवड करणे गरजेचे आहे. भविष्यात रशियामध्ये नियमितपणे केळी निर्यात सुरू झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अधिक वाचा: कोल्ड प्रेस तेल व रिफाइन्ड तेल यातील फरक काय? समजून घेऊया सोप्या भाषेत

Web Title: Banana Export : Big opportunity in Russia for banana export from Solapur district; Market worth Rs 9 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.