केळीच्या निर्यातीत नांदेड जिल्ह्यातील अर्धापुरी येथील केळी अव्वल ठरली असून, दीड महिन्यात १५० पेक्षा जास्त ट्रक परराज्यात तसेच विदेशात पाठवण्यात आले आहेत. पुढील काळात १०० ते १५० ट्रक निर्यात केली जाणार आहेत. अर्धापुरी केळी स्वादिष्ट, टिकाऊ व चांगल्या दर्जाची असल्याने देशभरात मागणी आहे.
केळी काढणीपासून ते प्रदेशात पाठवण्याचा कालावधी १५ ते २० दिवसांचा असल्याने केळी टिकाऊ व चांगल्या दर्जाची राहतात. अशी केळी पार्टी, निमगाव, चोरंबा, कारवाडी, सोनाळा, चाभरा, देळूब, भोगाव आदी भागातील अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे.
तसे पाहिले तर केळीसाठी हा पट्टा प्रसिद्ध आहे. मात्र, काही थोड्याच शेतकऱ्यांच्या प्रदेशात पाठवण्यासाठी निवड केली जाते. देशांतर्गत निर्यात होणाऱ्या केळीचा दर कमी असतो. परदेशात पाठवल्या जाणाऱ्या केळीला मात्र जास्त असतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदासुद्धा होतोय.
मागील आठवड्यात पार्डी म. येथील दोन शेतकऱ्यांची केळी परदेशांत पाठवण्यासाठी निवड केली होती. या दोन शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेतील एक एक गाडी भरण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसानंतर आणखी एक एक गाडी भरण्यात येणार आहे.
एका ट्रकमध्ये १० टन केळीच्या बॉक्समध्ये पॉकिंग करून ट्रक बंदरगापर्यंत पाठवलो जातो. येथून जहाजाच्या माध्यमातून हे बाहेर देशात पाठवली जातात, या प्रक्रियेला १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. म्हणून कंपनी चांगल्या व टिकाऊ केळीची निवड करतात. यावर्षी सर्वाधिक जास्त केळी निर्यात होणार आहे.
दर चांगला मिळतो
मागील आठवड्यात आमच्या केळीच्या बागेतील केळी परदेशात पाठवली गेली आहे. त्याचे वजन १० टन झाले होते आणि दरही चांगला लागला होता. - राजकुमार देशमुख, शेतकरी.
केळीचा दर्जा
माझे मळ्यातील एक गाडी भरण्यात आली आहे. परदेशात पाठवले जाणारी केळी चांगल्या दर्जाची लागते, तशी केळी आमच्याकडे होती म्हणून केळीची निवड करण्यात आली आहे. - गोविंदराव देशमुख, शेतकरी.
इराण, दुबईत गेली केळी
आतापर्यंत या परिसरातून १५० पेक्षा जास्त ट्रक निर्यात केली असून, पुढील काही दिवसात १०० ते १५० ट्रक निर्यात केली जाणार आहे. हा माल इराण, इराक, अबुधाबी, दुबई आदी देशासह दहा ते बारा देशांत पाठवला जातो, अशी माहिती सागर कोपर्डेकर व संग्राम बुटले यांनी दिली.
हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून नांदेडच्या माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट