Join us

Barnyard Millet: उपवासाला भगर खाताय मग सावधगिरी बाळगा; काळजी घेण्याचे विक्रेत्यांसह ग्राहकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 9:44 AM

Barnyard Millet: उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे भगर खाताना काय काळजी घ्यावी हे अनेकांना माहीत नसते. त्यामुळे विषबाधेच्या धोका वाढण्याची शक्यता असते.

उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे भगर खाताना काय काळजी घ्यावी हे अनेकांना माहीत नसते. त्यामुळे विषबाधेच्या धोका वाढण्याची शक्यता असते.

त्यामुळे भगर खावी की नाही, खावी तर काय काळजी घ्यावी, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. या सर्व प्रश्नांची प्रशासनाकडून उत्तरे देण्यात आली.

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. सुटी भगर घेऊ नका. भगर घेताना पाकिटावरचा पॅकिंग, अंतिम वापर दिनांक तपासा. जास्त दिवस भगर साठवू नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका.

भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.

सार्वजनिक कार्यक्रमांत भगरचा वापर

• सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भगर मोठ्या गंज / भांड्यामध्ये चुलीवर शिजविल्या जाते, अशावेळी एकसमान उष्णता न मिळाल्याने भांड्यातील काही भागांतील भगर अपक्च राहू शकते (अपूर्ण शिजते) मुख्यत्वे पृष्ठभागावरील मध्यभागी.

• ज्यामुळे बुरशी पूर्णपणे नष्ट होत नाही व वाटप करण्यास जास्त वेळ लागल्यास बुरशीची परत वाढ होऊन अन्नपदार्थ दूषित होऊ शकतात. त्यामुळे पूर्णपणे शिजल्याची खात्री करूनच भगर शिजविल्यापासून २ ते ३ तासांच्या आत संपवावी.

उलटी, मळमळ, पोटाचे त्रास

• भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. भगरीचे पीठ घरीच दळा, भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन-तीन दिवस सलग उपवास असताना या पदार्थाचे सेवन अॅसिडिटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात.

भगरविक्रेत्यांनी काळजी घ्यावी

• विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र.

• पॅकिंग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदत बाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करू नये. सुटी भगर, पीठ शक्यतो विक्रीसाठी ठेवू नये.

अन्न व औषध प्रशासनाचे वतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत कारवाई केली जात आहे. मात्र, ग्राहकांनीही भगर खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. - ए. अ. चौधरी, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन परभणी.

 हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

टॅग्स :हेल्थ टिप्सशेतकरीअन्नातून विषबाधाआषाढी एकादशीशेती क्षेत्रआरोग्य