नव्याने मधमाशा पालन करू इच्छिणारे तसेच आधीपासून या व्यवसायात असलेले अशा सर्वांसाठी गोखले एज्यूकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड यांच्या मार्गदर्शनाने मधमाशी पालन कार्यशाळा आयोजित केली आहे.
वेळ: सकाळी १० ते ५
दिनांक: १७ व १८ ऑगस्ट २०२३ (गुरुवार, शुक्रवार)
स्थळ: कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, ता. डहाणू, जिल्हा पालघर (डहाणू रेल्वे स्टेशन पासून ९ किमी असून रिक्षा भाडे २० रुपये)
मर्यादीत जागा फक्त 20
या प्रशिक्षणात आपल्याला काय शिकायला मिळेल ?
मधमाशीपालन शेतीला पूरक व जोडव्यवसाय, शुद्ध नैसर्गिक मधाचे उत्पादन, मधमाशांद्वारे परागीभवन घडवून अन्नधान्य व फळबाग उत्पादनात लक्षणीय वाढ कशी करावी?, सातेरी, मेलीफेरा, ट्रायगोना आणि फुलोरी मधमाशी जवळून पाहण्याचा व हाताळण्याचा दोन्ही दिवस सराव, मधमाशी वसाहती विभाजन करून नवीन वसाहती निर्माण करणे, निसर्गात आढळणार्या मधमाश्या पेटीत भरण्याची कला, नैसर्गिक सातेरी आणि फुलोरी माशी पेटीत घेण्याचे प्रत्यक्षिक, मधमाशांचे शत्रु, रोग व त्यापासून संरक्षण आणि अनुभवी मधपालकांची भेट, फार्म व्हिझिट व प्रात्यक्षिक, प्रत्येकाला मधमाशी हाताळण्याची संधी इत्यादी.
ही प्रशिक्षण कार्यशाळा मधुबनात होणार असून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाईल
मार्गदर्शक: प्रा. उत्तम सहाणे, कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल डहाणू
दोन दिवसाचे प्रशिक्षण शुल्क फक्त रू. १५००/-
त्यात चहा, नाष्टा, जेवन, राहण्याची सोय तसेच प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्र देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रा. उत्तम सहाणे 7028900289
प्रा. अनिल कुमार सिंग 84377 90403
डॉ. विलास जाधव 8552882712