Join us

कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड कडून १७ ऑगस्टला मधमाशीपालन कार्यशाळा

By बिभिषण बागल | Published: August 14, 2023 10:00 AM

कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड यांच्या मार्गदर्शनाने मधमाशी पालन कार्यशाळा आयोजित केली आहे.

नव्याने मधमाशा पालन करू इच्छिणारे तसेच आधीपासून या व्यवसायात असलेले अशा सर्वांसाठी गोखले एज्यूकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड यांच्या मार्गदर्शनाने मधमाशी पालन कार्यशाळा आयोजित केली आहे.

वेळ: सकाळी १० ते ५दिनांक: १७ व १८ ऑगस्ट २०२३ (गुरुवार, शुक्रवार) स्थळ: कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, ता. डहाणू, जिल्हा पालघर (डहाणू रेल्वे स्टेशन पासून ९ किमी असून रिक्षा भाडे २० रुपये)मर्यादीत जागा फक्त 20

या प्रशिक्षणात आपल्याला काय शिकायला मिळेल ?

मधमाशीपालन शेतीला पूरक व जोडव्यवसाय, शुद्ध नैसर्गिक मधाचे उत्पादन, मधमाशांद्वारे परागीभवन घडवून अन्नधान्य व फळबाग उत्पादनात लक्षणीय वाढ कशी करावी?, सातेरी, मेलीफेरा, ट्रायगोना आणि फुलोरी मधमाशी जवळून पाहण्याचा व हाताळण्याचा दोन्ही दिवस सराव, मधमाशी वसाहती विभाजन करून नवीन वसाहती निर्माण करणे, निसर्गात आढळणार्‍या मधमाश्या पेटीत भरण्याची कला, नैसर्गिक सातेरी आणि फुलोरी माशी पेटीत घेण्याचे प्रत्यक्षिक, मधमाशांचे शत्रु, रोग व त्यापासून संरक्षण आणि अनुभवी मधपालकांची भेट, फार्म व्हिझिट व प्रात्यक्षिक, प्रत्येकाला मधमाशी हाताळण्याची संधी इत्यादी.ही प्रशिक्षण कार्यशाळा मधुबनात होणार असून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाईलमार्गदर्शक: प्रा. उत्तम सहाणे, कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल डहाणू

दोन दिवसाचे प्रशिक्षण शुल्क फक्त रू. १५००/-त्यात चहा, नाष्टा, जेवन, राहण्याची सोय तसेच प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्र देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्कप्रा. उत्तम सहाणे 7028900289प्रा. अनिल कुमार सिंग 84377 90403डॉ. विलास जाधव 8552882712 

टॅग्स :शेतीशेतकरीपालघरपीक