लातूर जिल्ह्यात यंदा मृग दमदार झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी खरीप पेरणीची लगबग करीत आहेत. आतापर्यंत जवळपास २ लाख ६४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागात सुरुवातीस चांगला पाऊस झाला असला तरी आता जमिनीतील ओल कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला जिल्हा कृषी विभागाने दिला आहे.
किती पाऊस पडला तर पेरणी करायची?
पेरणीसाठी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जमिनीत पुरेशी ओल असणे अत्यंत आवश्यक आहे.
आतापर्यंत किती पाऊस झाला?...
मृगाच्या प्रारंभापासून जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. आतापर्यंत १८०.४ मिमी पाऊस झाला आहे. चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.
काही ठिकाणी जमिनीतील ओल कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. बियाणे, खते खरेदीवेळी पक्की पावती घ्यावी. - सुभाष चोले
कोणत्या तालुक्यात किती पाऊस?...
तालुका पाऊस (मि.मी.)
लातूर २०६,४
औसा २२३.६
अहमदपूर १३८.८
निलंगा २०३.०
उदगीर १३४.३
चाकूर १८८.४