बांबू एक बहुउपयोगी वृक्ष आहे. मात्र आजही अनेकांना बांबू पासून नक्की काय काय फायदे होतात याची परिपूर्ण माहिती नाही. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत 'बांबू'चे पर्यावरण विषयक, आरोग्यदायी लाभ आदींची परिपूर्ण माहिती.
बांबूचे सामाजिक/ पर्यावरण विषयक फायदे
• बांबू इतर सर्व झाडांपेक्षा जास्त प्रमाणात हवेतील कार्बन शोषते आणि ऑक्सिजन देते. त्यामुळे बांबू हा ग्लोबल वॉर्मिंगवर एक उत्तम उपाय ठरू शकतो.
• पृथ्वीवरील इतर वनस्पतीपेक्षा बांबूची वाढ वेगाने होते आणि जमिनीखाली बांबूच्या मुळाचे जाळे देखील इतर वनस्पतीपेक्षा दाट असतात. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते.
• जमिनीखाली बांबूच्या मुळाच्या दाट जाळ्यामुळे पावसाचे पाणी इतर वृक्षांच्या तुलनेत जास्त प्रमाणत जमिनीत मुरवते.
• अलीकडील बांबूचा मोठ्या प्रमाणात वापर वीज निर्मितीसाठी, बायोगॅस, बायो इथेनॉल, बायो-सीएनजी, बायो-ऑईल, कोळसा, बायो-प्लास्टिक किंवा को-पॉलीमर, कापड कॉक्रीड मजबुतीकरण इत्यादींमध्ये केला जातो.
बांबूचे आरोग्यदायी लाभ
• बांबू सर्वात वेगवान वाढणारी वनस्पती असून, दरवर्षी बांबू बागेत एक एकरातून ६० टनांहून जास्त ऑक्सिजन तयार होते जे २०० पेक्षा जास्त मानवास श्वास घेण्यासाठी पुरेसे आहे.
• कार्बन सीक्केस्ट्रेशन क्षमतेचे CO2 मध्ये कपात करण्याव्यतिरिक्त बांबू त्याच्या पानांच्या पृष्ठभागावरून PM२.५ आणि PM१० कमी करते.
• बांबूच्या शूटच्या आरोग्य फायद्यांमध्ये वजन कमी करणे, कोलेस्ट्रोलचे स्तर संतुलित करणे आणि वाढीव रोगप्रतिकारक शक्तीचा समावेश आहे.
• बांबूमध्ये कर्करोगाविरुद्ध लढण्याचे आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत ते हृदयासाठी अनुकूल आहेत आणि त्यात प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजांचा पुरवठा आहे.
लेखन व शब्दांकन
डॉ. संतोष चव्हाण
(विषय विशेषज्ञ उद्यानविद्या)
डॉ प्रवीण चव्हाण
(विषय विशेषज्ञ कृषि विस्तार)
संस्कृति संवर्धन मंडळ संचालित, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड.