Join us

शेतकऱ्यांना मिळणार लाभ; वीजबिलात मिळणार ३३ टक्के सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 12:14 PM

शेतकऱ्यांना वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याअनुषंगाने..

दुष्काळसदृश परिस्थितीत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. जिल्ह्यातील १६ महसूल मंडळांतील १ लाख ८३ हजार २८२ शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात बीडच्या १६ महसूल मंडळांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला होता. या सात तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विविध क्षेत्रात सवलती देण्यात आल्या होत्या. यातच

चालू वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला होता. बीड जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार २८२ कृषी क्षेत्रातील वीज जोडण्यांपैकी १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना २८ कोटी ४० लाख एवढी सवलत प्रदान करण्यात आली आहे. उर्वरित ३६ हजार २०० शेतकऱ्यांना सवलतीचा लाभ द्यायचे बाकी आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच या सवलीतचा लाभ मिळणार आहे.

कोणत्या तालुक्यातील किती महसूल मंडळांचा समावेश

बीड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १६ महसूल मंडळांचा या सवलतीत समावेश होता. बीड तालुक्यातील ५, पाटोदा, १, आष्टी ३. माजलगाव १, केज २, परळी १ व शिरूरच्या ३ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ घेता येत आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ८३ हजार २८२ शेतकऱ्यांना वीजबिलात शेवटपर्यंत लाभ मिळणार आहे. दरम्यान, ही सवलत केवळ चालू वीजबिलात देण्यात येत असल्यामुळे अनेक शेतकरी या लाभापासून विमुक्त राहिले आहेत.

हेही वाचा - सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असावेत असे शेती पिकांसाठी फायद्याचे मोबाईल ॲप्स

टॅग्स :शेतकरीशेतीवीजपाणीमहावितरणशेती क्षेत्रबीडमराठवाडाविदर्भ