Join us

Best Sugar Factory : उच्चांकी गाळप व दरामुळे हा कारखाना ठरला राज्यातील बेस्ट शुगर फॅक्टरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:42 AM

Best Sugar Factory in Maharashtra दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्या वतीने दि माळेगाव सहकारी साखर कारखान्यास सन २०२४चा 'बेस्ट शुगर फॅक्टरी' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बारामती : दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्या वतीने दि माळेगाव सहकारी साखर कारखान्यास सन २०२४चा 'बेस्ट शुगर फॅक्टरी' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे वितरण शनिवारी (दि. २४) हॉटेल जे.डब्ल्यू, मॅरियट येथे नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगरचे फॅक्ट्रीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, साखर आयुक्त कुणाल खेमणार, एस.एस. भड आदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑनलाइन मार्गदर्शनपर भाषण केले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप, व्हाइस चेअरमन तानाजी देवकाते, संचालक बाळासाहेब तावरे, रंजनकुमार तावरे, योगेश जगताप, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, तानाजी कोकरे, संजय काटे, सुरेश खलाटे, अनिल तावरे उपस्थित होते.

तसेच मदनराव देवकाते, दत्तात्रय येळे, प्रताप आटोळे, नितीन सातव, गुलाबराव गावडे, राजेंद्र ढवाण, स्वप्निल जगताप, पंकज भोसले, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, मगेश जगताप, नितीन जगताप, भीमदेव आटोळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव पाटील, वर्क्स मॅनेजर अनिल वाबळे, चिफ केमिस्ट विकास फडतरे, डिस्टिलरी मॅनेजर नंदकुमार जगदाळे उपस्थित होते.

उच्चांकी गाळप, दरामुळे कारखान्याला अव्वल स्थान- माळेगाव सहकारी साखर कारखान्याने नेहमीच उच्चांकी गाळप, उच्चांकी दर दिलेला असल्याने सहकारी साखर कारखानदारीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.कारखान्याने नेहमीच सहकारी साखर कारखानदारीस दिशा दिली. सहकारी चळवळीच्या माध्यमातून समाजपरिवर्तन करण्याचे हेतूने कारखान्याने साखर उद्योगाच्या व उपपदार्थ निर्मितीची यशस्वी वाटचाल केलेली आहे.यात कारखान्याचे संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे. यंदाच्या हंगामाचे पूर्वतयारीसाठी कारखान्यामधील अंतर्गत कामे चालू आहेत. हंगाम वेळेत सुरू करण्यास सर्व विभाग प्रमुख प्रयत्नशील आहे.यंदा पर्जन्यमान चांगले असून, हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा मानस अध्यक्ष केशवराव जगताप यांनी व्यक्त केला.

टॅग्स :साखर कारखानेऊसमालेगांवबारामतीमहाराष्ट्र