Join us

खबरदार, बैलांवर उसाचा जादा भार लादल्यास कारवाई; साखर आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:20 IST

कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. त्यासाठी बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त उसाचा भार लावून बैलांना कटु पद्धतीने वागणूक दिली आत असल्याचे ठिकठिकाणी रस्त्यांवर दिसत आहे.

रमेश कोठारीश्रीरामपूर : कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. त्यासाठी बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त उसाचा भार लावून बैलांना कटु पद्धतीने वागणूक दिली आत असल्याचे ठिकठिकाणी रस्त्यांवर दिसत आहे.

अशा पद्धतीने बैलांकडून क्षमतेपेक्षा आस्त ऊस वाहतूक केल्यास कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

राज्याचे साखर आयुक्त दीपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी तसेच प्रादेशिक साखर सहसंचालक, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संथाचे व्यवस्थापकीय संचालक यांना याबाबत निर्देश दिले आहेत.

श्रीरामपूर येथील प्रेरणा फाऊंडेशनच्या आल्हाट यांनी याबाबत साखर आयुक्त व पशुसंवर्धन आयुक्तांकडे तक्रार केली होती. यांची दखल घेऊन आयुक्तांनी आदेश दिले.

आयुक्तांचे हे आहेत आदेश- बैलगाडीने ऊस वाहतूक करताना बैलांना क्रूरतेची वागणूक देऊ नये, बैलांवर क्षमतेपेक्षा जास्त वजन लादू नये.- सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पशुधनाची पायी ने-आण करू नये.- जखमी, आजारी कुपोषित किंवा जास्त वय असलेल्या बैलांचे स्वास्थ्य उचित रहावे यासाठी सक्तीची विश्रांती देण्यात यावी.- जनावरांना नऊ तासांहून अधिक काळ वाहतूक देऊ नये.- दुपारी १२ ते ३ या वेळेत विश्रांती देण्यात यावी.- खाण्या-पिण्यासाठी चार किलोमीटरच्या पलीकडे प्राण्यांची ने-आण करता येणार नाही.

अशा सूचना साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक यांना देण्यात आलेल्या आहेत.

अधिक वाचा: पुणे जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली; सोमेश्वर साखर कारखान्याकडून पहिली उचल जाहीर

टॅग्स :ऊससाखर कारखानेसरकारराज्य सरकारआयुक्त