अकोला जिल्ह्यात विषारी असलेल्या घोणस जातीच्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पातूर तालुक्यातील सस्ती शिवारात एका युवा शेतकऱ्याला या अळीचा दंश केल्याची घटना दि. २४ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. चावा घेतल्याने वेदना असह्य झाल्या व शेतकरी बेशुद्ध झाला होता. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्या शेतकऱ्याला वाडेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे.
पातूर तालुक्यातील सस्ती येथील सुनील सदाशिव ताले हे शेतात गेले होते. गुरांना चारा कापणी करीत असताना गवतावर असलेल्या विषारी घोणस अळीने त्यांना दंश घेतला. प्रसंगी काही रूतल्याचे जाणवले. त्यानंतर सुनील ताले यांनी पाहिले तर अळीने चावा घेतल्याचे दिसून आले. थोडा वेळाने त्यांच्या शरीरात मुंग्या धावत असल्याने त्यांनी घरच्यांना घटनेबाबत माहिती दिली. घरचे शेतात पोहोचताच शेतकरी सुनील ताले है बेशुद्ध झाले होते. त्यांना तत्काळ वाडेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे; परंतु शेतात घोणस अळी दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
कुठे आढळते ही अळी?
■ ही अळी खादाड असल्याने झपाट्याने पानांवरील हिरवा भाग खाऊन फस्त करते व पानांना केवळ शिरा शिल्लक ठेवते.
■ ती शक्यतो पावसाळ्यात, परतीच्या पावसाचा काळ आणि उष्ण व आर्द्र हवामानात शेताच्या धुयावर किंवा शेतातील तृणवर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणावर आढळून येते,
दंश झाल्यास काय कराल?
शेतकयांनी या अळीला घाबरून न जाता गवत काढताना किंवा शेतातील कामे करताना या किडीचे निरीक्षण करून ती आपल्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. ती त्वचेच्या संपर्कात आल्यास चिकट टेप त्या भागावर चिकटवून तो हलक्या हाताने काढावा. त्या ठिकाणी बर्फ तसेच बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावावी. लक्षणे तीव्र असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संबंधित वृत्त:
घोणस अळीचे व्यवस्थापन कसे कराल?
शेतकऱ्यांनी घाबरू नये..
अळीच्या व्यवस्थापनासाठी गवतावर कीटकनाशकाची फवारणी केल्यास ते गवत फवारणीनंतर किमान सात दिवस गुरांना खाऊ घालू नये, ही अळी तिच्या स्वरक्षणासाठी केसांमधील विषारी रसायन माणसांच्या त्वचेत सोडते. ती सहसा माणसांच्या दिशेने येत नाही. मित्र किडींमुळे घोणस अळीचे नियंत्रण होते. कीटकनाशकांच्या फवारणीतून व्यवस्थापन करता येते. शेतकन्यांनी या अळीला घाबरू नये. मात्र, काळजी घेणे गरजेचे आहे.
अळीच्या शरीरावरील काट्यामध्ये संरक्षित विषारी रसायन असते. अळी त्याचा वापर स्वतःच्या संरक्षणासाठी करते. काटा त्वचामध्ये टोचल्यास अळी विषारी रसायन त्वचेमध्ये सोडते त्यामुळे खूप आग होते. प्रत्येक मानवामध्ये लक्षणे वेगळी राहू शकतात. फवारणीतून अळीचे व्यवस्थापन केले जाते. शेतकऱ्यांनी घाबरुन जाता काळजी घ्यावी. -डॉ. धनराज उंदीरवाडे, विस्तार शिक्षण संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.