Lokmat Agro >शेतशिवार > Bibtya Attack : बिबट्यासोबत जगायचे की मरायचे? कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Bibtya Attack : बिबट्यासोबत जगायचे की मरायचे? कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Bibtya Attack : Live or die with the leopard? How to take care read in detail | Bibtya Attack : बिबट्यासोबत जगायचे की मरायचे? कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Bibtya Attack : बिबट्यासोबत जगायचे की मरायचे? कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये बिबट-मानव संघर्ष गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे वन विभागातर्फे विविध उपाययोजना होत आहेत. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राची क्षमता ४४ आहे, ती १२५ करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये बिबट-मानव संघर्ष गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे वन विभागातर्फे विविध उपाययोजना होत आहेत. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राची क्षमता ४४ आहे, ती १२५ करण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

श्रीकिशन काळे
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये बिबट-मानव संघर्ष गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे वन विभागातर्फे विविध उपाययोजना होत आहेत. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राची क्षमता ४४ आहे, ती १२५ करण्यात येणार आहे.

बिबट्यांची नसबंदी होणार असून, ६५ बिबट्यांचे दूरच्या अभयारण्यात स्थलांतर करण्यात येणार आहे, अशी उपाययोजना केल्या आणि माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली. योग्य सावधानता चाळगली, तर बिबट्यासोबतही चांगल्या प्रकारे जगता येऊ शकते.

जुन्नर वन विभागांतर्गत वन्यप्राणी बिबटच्या हल्ल्यामध्ये जिवितहानी झालेल्या मागील १० वर्षातील घटनांचा अभ्यास केला असता हे हल्ले शेतीच्या विविध कामांसाठी शेतकरी/मजूर सायंकाळी जात असताना घडले आहेत, शेत परिसरात घराच्या आसपास तारेचे कुंपण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काही महिन्यांमध्ये वन्यप्राणी बिबट याच्या हल्ल्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे विविध उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. त्यासाठीच वन विभागाने अनेक प्रस्ताव सरकारकडे सादर केले आहेत.

जुन्नर वन विभागाने मागील २ वर्षे प्रयत्न व पाठपुरावा केल्याने माणिकडोह बिबट निवारा केंद्र विस्तारीकरणासाठी आवश्यक १२.५० हेक्टर नवीन जागा राज्य सरकारकडून मिळविण्यात यश मिळविले आहे.

बिबट निवारा केंद्राची क्षमता ४४ वरून १२५ होणार असून, या कामाला राज्य सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाली. त्या कामाचे ई-टेंडरदेखील केले असून, पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण होईल.

वनक्षेत्रात अधिवास उपलब्धतेच्या अनुषंगाने वन्यजीवांच्या निर्धारित संख्येपेक्षा जास्त असलेल्या बिबटघांना देशातील इतर भागांत स्थलांतरित करण्यात येईल. त्यासाठी ७५ विवत्यांचा समावेश आहे. याचा प्रस्तावदेखील केंद्र शासनाकडे चार महिन्यांपूर्वी दिला असून, त्याचा पाठपुरावा केला जात असल्याचे सातपुते यांनी सांगितले.

बिबट कृती दलाचे बेस कॅम्प
अतिसंवेदनशील भागांमध्ये बिबट्यांमुळे सतत उद्‌भवणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी ठिकठिकाणी स्थानिक तरुणाच्या सहभागातून बिबट कृती दलाचे चार बेस कॅम्प निर्माण केले आहेत. बेस कॅम्पच्या बचाव दलातील सदस्य, तसेच संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नियमित रात्रगस्त करणे, सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती करणे आदी कामे होत आहेत.

काटेरी पट्टा
विद्या प्रतिष्ठान बारामती व सिमुमॉपट टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या मदतीने शेतात काम करणाऱ्या माणसांच्या सुरक्षेसाठी मानेला लावण्याचा विशिष्ट प्रकारचा काटेरी पट्टा (नेक बेल्ट) विकसित करण्यात आला आहे, मेंढपाळांसाठी तंबू पुरविण्यात येत आहेत.

सौरऊर्जा कुंपण
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या धर्तीवर शेतातील घरे आणि गोठ्यासाठी सौरऊर्जा कुंपण पुरविण्याबाबतची नवी संकल्पना मांडून, राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प जुन्नर वन विभाग राबवीत असून, लोकजीवन अधिक सुरक्षित होण्यासाठी मदत होईल.

काय काळजी घ्यावी
● शेतातील काम समूहाने आणि आवाज करत करावे, यात सावधानता बाळगावी.
● लहान मुले/वृद्धांना घराच्या बाहेर एकटे हे सोडू नये, घर उघडे ठेवू नये.
● शेतात एकटी घरे व गोठ्याभोवती कुंपण करून घ्यावे.
● घराच्या आजूबाजूला गवत, वाढू देऊ नका, स्वच्छता ठेवा.
● दिवस उगवण्यापूर्वी व मावळल्यानंतर शक्यातो घराबाहेर पडू नये.
● घराबाहेर रात्रीच्या वेळी मोठे प्रकाशदिवे लावावेत.

जुन्नर वन विभागांतर्गत वन्यप्राणी बचाव दलाने बळकटीकरण केले असून, आजमितीस ४ बिबट बेस कॅम्प, सुमारे २५० पिंजरे, २३५ कॅमेरे, ३ थर्मल ड्रोन आणि चार रेस्क्यू व्हॅन इत्यादीच्या माध्यमातून त्यास सुसज्ज करण्यात आलेले आहे. विशेष बिबट संरक्षण दलअंतर्गत अतिरिक्त ३० अधिकारी-कर्मचारी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे मे २०२४ मध्ये सादर केला आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर वन विभाग

Web Title: Bibtya Attack : Live or die with the leopard? How to take care read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.