Join us

Biogas Yojana : बायोगॅस अनुदानासाठी १५ लाखांचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:16 PM

Biogas Yojana: ग्रामीण भागात इंधन म्हणून गॅस निर्मिती व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजना राबविण्यात येत आहे.

Biogas Yojana : 

रासायनिक खताचा वापर कमी व्हावा आणि शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे, तसेच ग्रामीण भागात इंधन म्हणून गॅस निर्मिती व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना बायोगॅस बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. २०२२-२३ मध्ये बायोगॅस उभारलेल्या हिंगोली जिल्ह्यातील ९३ लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होण्याची शक्यता आहे.बायोगॅस सयंत्राच्या उभारणीतून ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इंधन व शेतीसाठी सेंद्रिय शेती खताचा पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजना राबविली जाते. स्वच्छता व पर्यावरण संतुलन राखणे योजनेचे उद्दिष्ट आहे. हिंगोली जिल्ह्याला २०२२-२३ मध्ये ९३ बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट  देण्यात आले होते. यात हिंगोली, कळमनुरी व वसमत तालक्यासाठी प्रत्येकी १९ व औंढा, सेनगाव तालुक्यासाठी प्रत्येक १८ बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट होते. 

सर्वच उद्दिष्ट पूर्णजिल्ह्याला २०२२-२३ मध्ये दिलेले ९३ बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले आहे. या लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केली होती.

असे मिळते अनुदानबायोगॅसच्या आकारानुसार अनुदान मिळते. जिल्ह्यात लाभार्थ्यांना १४ हजार ३५० ते २२ हजार ७५० रूपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. पात्र लाभार्थ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज सादर केले होते.

१५ लाखांचा निधीजिल्ह्यातील ९३ पात्र लाभार्थ्यांसाठी जवळपास १५ लाख २५ हजार ८०० रूपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. हे अनुदान प्राप्त होताच काही दिवसांतच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल.

 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजना