कारले म्हटल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर आठ्या येतात आणि तोंड वाकडे केले जाते. मात्र, कारले कडू जरी असले तरी, आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.
मधुमेहासारख्या आजारावर तर कारल्यासारख्या कडू भाज्य उत्तम उपाय ठरू शकतात. हिरव्या भाज्या विविध कारणांसाठी उपयुक्त असतात.
चवीने कडू असली तरीही ही भाजी खाण्याची लहानपणापासून सवय असल्यास ती नकोशी होत नाही. तसेच हा कडूपणा कमी करण्याच्या अनेक पद्धती आहेत.
त्याही भाज्या करणाऱ्या महिलांनी माहीत करून घेणे आवश्यक आहे. हृद्यरोगासाठी कारले अतिशय उपयुक्त असते. यामुळे हदय मजबूत होऊन हदयरोग होण्यापासून बचाव होतो.
कारल्याने हृद्य मजबूत होते आणि हृदयरोग होत नाही. याशिवाय कावीळ आणि हिपेटायटिस यांसारख्या आजारांसाठीही अतिशय उपयुक्त असते.
कारल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. एक ग्लास कारल्याचा रस आणि त्यात अर्धे लिंबू टाकून प्यायल्याने अनेक आजारांवर मात करण्याची ताकद मिळते.
कारल्याच्या रसाने त्वचारोगावर नियंत्रण राहते. रोज एक ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत होते.
शरीरातील साखरेवर ठेवते नियंत्रण
● कारलेने शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले अतिशय उपयुक्त ठरते.
● अन्नाचे पचन होण्यासाठी तसेच भूक लागण्यास मदत होते आणि वजन कमी होण्यासही उपयोग होतो.
● सकाळी उपाशीपोटी कारल्याचा रस पिणे हे मधुमेहावर रामबाण उपाय ठरू शकतो.
● हिरव्या भाज्या या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.
● त्याचप्रमाणे कारल्याचा रस प्यायल्याने डोळे निरोगी राहतात.
● सध्या आपण दिवसातील सर्वाधिक काळ कॉम्प्युटर स्क्रीनसमोर असतो. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. मात्र, कारले खाल्ल्याने डोळ्यांचे आजार होत नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अधिक वाचा: Harbhara Bhaji : हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर ठेवते अनेक आजारांपासून दूर वाचा सविस्तर