Lokmat Agro >शेतशिवार > Bogus Crop Insurance : ८४० बोगस पीकविमाधारकांना नोटीस; घेतलेले पैसे होणार वसूल वाचा सविस्तर

Bogus Crop Insurance : ८४० बोगस पीकविमाधारकांना नोटीस; घेतलेले पैसे होणार वसूल वाचा सविस्तर

Bogus Crop Insurance: Notice to 840 bogus crop insurance holders; Money taken will be recovered Read in detail | Bogus Crop Insurance : ८४० बोगस पीकविमाधारकांना नोटीस; घेतलेले पैसे होणार वसूल वाचा सविस्तर

Bogus Crop Insurance : ८४० बोगस पीकविमाधारकांना नोटीस; घेतलेले पैसे होणार वसूल वाचा सविस्तर

Bogus Crop Insurance: बोगस पीकविमा (Bogus Crop Insurance) भरणाऱ्या ८४० जणांना तब्बल ७८ लाख रुपये मंजूर झाले होते. संबंधित व्यक्तींना भारतीय कृषि विमा कंपनीकडून नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे.

Bogus Crop Insurance: बोगस पीकविमा (Bogus Crop Insurance) भरणाऱ्या ८४० जणांना तब्बल ७८ लाख रुपये मंजूर झाले होते. संबंधित व्यक्तींना भारतीय कृषि विमा कंपनीकडून नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा (Bogus Crop Insurance) भरणाऱ्या ८४० जणांना तब्बल ७८ लाख रुपये मंजूर झाले होते. संबंधित व्यक्तींना भारतीय कृषि विमा कंपनीकडून नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे.

पीक विम्याचे पैसे परत कंपनीच्या खात्यावर जमा केले नाही तर संबंधितावर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा कंपनीने दिला आहे. (Bogus Crop Insurance)

खरीप-२०२३ च्या हंगामामध्ये दलाल, सीएससी चालकांनी ३,३५७ जणांच्या नावे बोगस पीकविमा भरला असल्याचा आरोप करत आ. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. (Bogus Crop Insurance)

या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली होती. त्यानुसार भारतीय कृषी पीकविमा कंपनीने पडताळणी करून ३,३५७ विमा अर्जापैकी २,२८४ विमा अर्ज पूर्वीच नाकारले होते.  (Bogus Crop Insurance)

तर १०७३ अर्ज 'एआयसी'ने मंजूर केले होते. १०७३ अर्जापैकी २३३ अपात्र ठरले होते. त्यामुळे एकूण ८४० विमा अर्ज मंजूर झाले होते. त्यापैकी ३४० जणांना ३४ लाख वितरित झाले असून ५०० जणांच्या खात्यावर ४४ लाख रुपयांची विमा रक्कम जमा होत आहे. सदरील ८४० बोगस पीक विमाधारकांकडून सर्व रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्या संदर्भाने नोटिसा दिल्या जात आहेत.

खाते क्रमांक दिला

* पीक विमा कंपनीकडून नोटिसा पाठविल्या जात असून प्राप्त रक्कम जमा करण्यासाठी एका बँकेचा खाते क्रमांक देण्यात आला आहे.

* बँक खात्यावर ताबडतोब रक्कम जमा करून ईमेल किंवा मोबाईल नंबरवर कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनामार्फत विमा अनुदान दिले जाते.

* चुकीचा विमा भरल्याने केंद्र व राज्य शासनाची फसवणूक केली, असे समजून कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

* जमा होणारी रक्कम अर्थात विमा हप्ता राज्य व केंद्र शासनास परत दिला जाणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Godavari Toor: शेतकऱ्यांच्या दारी तुरी; आली समृद्धीची 'गोदावरी' वाचा सविस्तर

Web Title: Bogus Crop Insurance: Notice to 840 bogus crop insurance holders; Money taken will be recovered Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.