मृग बहार फळपीक(Fruit Crop) विमा(Insurance) योजनेच्या नावाखाली काही जणांनी फळबाग नसतानादेखील बोगस विमा काढला असल्याचे उघड झाले आहे. जालना जिल्हा बोगस फळपीक विमा काढण्यात महाराष्ट्रात अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात सुमारे ७ हजार ३०७ बोगस पीकविमाधारक असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी कृषी विभागाने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत.
कुठलीही फळबाग न लावता बोगस कागदपत्रांच्या आधारे फळपीक विम्यासाठी(Bogus Pik Vima) अर्ज केल्याचे उघड झाले आहे. यामुळे फळपीक विम्यासाठी केलेल्या अर्जाची(Application) तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे. यात सुमारे ७ हजार ३०७ अर्ज बोगस कागदपत्रांच्या आधारे भरण्यात आलेले आहेत.
अर्जाची छाननी
* नुकसानग्रस्त फळबागांच्या पंचनाम्याच्या आधारे विमा कंपनीकडून मदतीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येते. यामुळे जिल्ह्यातील फळपीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाकडून तयार करण्यात आली होती.
* मात्र, या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या अनेकांनी फळबागा नसताना विमा भरल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर कृषी विभागाकडून विमा भरलेल्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली.
* यात ७ हजार ३०७ अर्जामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. हे अर्ज बोगस कागदपत्रांच्या आधारे भरल्याचे दिसून आले आहेत.
यादी देण्याचे पत्र
* अनेकांनी फळपीक विमा भरताना बोगस कागदपत्रे जोडल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. यानंतर प्रशासनाने बोगस फळपीक विमा भरणाऱ्यांची यादी देण्याचे निर्देश कृषी विभागास दिले आहेत.
* अद्याप कृषी विभागाकडून बोगस अर्ज भरणाऱ्याची यादी प्रशासनास देण्यात आलेली नाही. ही यादी प्रशासनास मिळाल्यानंतर बोगस विमा भरणाऱ्यांची नावे मदतीच्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीतून काढून टाकण्यात येणार आहेत.
* सन २०२४-२५ यावर्षी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत राज्यभरातील ७३ हजार ७९० अर्जापैकी तब्बल १९ हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. विमा योजनेमध्ये अनेक गैरप्रकार उघड होत असल्याने त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
* बोगस पीकविमा भरणाऱ्यांना पीक विम्यासह कृषी विभागाच्या अन्य योजनांचा या शेतकऱ्यांना किमान पाच वर्षापर्यंत कुठलाही लाभ मिळू नये, असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला पाठविला आहे.
हे ही वाचा सविस्तर: Bogus Pik Vima : कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बोगस फळपीक विमा, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर