Bogus Seeds : खरीप हंगाम २०२५ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके मिळावी, यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने व्यापक पावले उचलली आहेत.(Bogus Seeds)
या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात १४ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यात प्रत्येक तालुक्यासाठी १ आणि जिल्हास्तरावर १ भरारी पथकाचा समावेश आहे.(Bogus Seeds)
दरम्यान सन २०२४-२५ मध्ये बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री केल्याप्रकरणी ३५० परवाने रद्द करण्यात आले. शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळू नये, याची खबरदारी कृषी विभागाच्या वतीने घेण्यात येते, तसेच जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात येतात. यावर्षी खरीप हंगामापूर्वीच पथके स्थापन करण्यात आली आहेत.(Bogus Seeds)
या पथकांच्या माध्यमातून नियमित कारवाई करण्यात येते सन २०२४-२५ मध्ये पथकांच्या माध्यमातून विविध कृषी निविष्ठांचे एकूण दोन हजार १६२ नमुने तपासणीसाठी घेतले गेले. त्यामध्ये बियाणांचे १ हजार ३१२, खते ६१९ आणि कीटकनाशकांच्या २३१ नमुन्यांचा समावेश आहे.(Bogus Seeds)
यापैकी ८१ नमुने तपासणीत नापास झाले आहेत तसेच १७ प्रकरणांमध्ये सक्त ताकीद देण्यात आली. ११ प्रकरणे न्यायालयात, तर १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले.(Bogus Seeds) खरीप हंगामापूर्वी पथकांची स्थापना झाली असून प्रसंगी बोगस बियाणे विक्रेत्यांवर मोठी कारवाई होईल.
प्रत्येक तालुक्यात भरारी पथक
खरीप हंगामासाठी प्रत्येक तालुक्यात एक भरारी पथक राहणार आहे, तसेच जिल्हास्तरावर एक पथक राहणार आहे. कृषी विभागांतर्गत गुणवत्ता नियंत्रणासाठी भरारी पथकांमार्फत दर महिन्याला अचानक तपासणी करण्यात येत आहे
बोगस खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री होत असल्यास तालुका कृषी अधिकारी अथवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश सावंत यांनी केले आहे.
१७२ लाख मेट्रिक टन खतांची मागणी
जिल्ह्यात सात लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर खरिप पिकांची लागवड करण्यात येते. २०२५ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून १ लाख ७२ हजार ७५० मेट्रिक टन खतांची मागणी शासनाकडे केली आहे. त्यामुळे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच ही खते उपलब्ध होतील.
३५० परवाने रद्द; कारवाईचा तपशील
रासायनिक खते | ११८ |
कीटकनाशके | ११६ |
बियाणे | ११६ |
११६ केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द !
तपासणीदरम्यान बोगस बियाणांची विक्री करताना आढळलेल्या ११६ केंद्रांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत, तसेच बियाणांचे १७४, खतांचे २८ आणि १४ कीटकनाशकांची विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.
खरीप हंगाम २०२५ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके मिळावीत यासाठी प्रत्येक तालुक्यात एक आणि जिल्हा स्तरावर एक अशी १४ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत तपासणी, तसेच कारवाई करण्यात येत आहे. बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. खरीप हंगामाच्या दृष्टीने कृषी विभाग सक्रीय झाल आहे.
- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा