बालाजी आडसूळ
अडीच वर्षांपूर्वी ज्या कळंब (जि. धाराशिव) बीट मार्केटला तब्बल २ हजार १७४ रुपये असा एका क्रेटला विक्रमी भाव मिळाला होता, त्याच मार्केटमध्ये आज टोमॅटो क्रेट फक्त शंभर ते दीडशे रुपयाला जात आहे.
एकूणच बड्या मार्केटला जावा तर पाच-सहा रुपयांचा दर अन् वाहतुकीमुळे ते पडतळ खात नाही. आठवडी बाजारात जावे तर तिथे दहा रुपये किलोनं पण ग्राहकांचे पाय थबकेनात, अशीच विदारक स्थिती.
निव्वळ शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या व्यक्तीच खराखुरा शेतकरी असतो, त्यालाच शेती कसने किती कष्टप्रद, जोखमीचं असतं हे माहीत असते. त्याच्यासाठी शेती एक 'जुगार असतो. त्या शेतीचा मुख्य आधार असलेला निसर्ग अन् बाजार व्यवस्था बेभरवशाची असते.
बाकी, इकडचा पैसा तिकडं टाकणाऱ्या मंडळीसाठी शेती कसणे म्हणजे एक 'प्रयोग असतो. अर्थकारणाला स्थिरस्थावर करणारे अन्य 'जोड' असल्याने शेती त्यांच्यासाठी एक 'साइड बिझनेस असतो. यामुळे पिकलं, विकलं तरच सुखानं झोपलं अशी त्यांची स्थिती नसते.
रविवारी अशाच निव्वळ शेतीवर प्रपंच निर्भर असलेल्या काही तरकारी उत्पादक शेतकऱ्यांचा प्रसंग होता. त्यांचे शेती उत्पादन होते टोमॅटो. कळंबच्या आठवडी बाजारात अन् वाकडी (के) शिवार गाठून थेट शेतकऱ्यांच्या फडात जात ग्राउंड रिपोर्ट केला. भयानक स्थिती, मन हेलावून टाकणारी.
प्रसंग १ : भूतकाळ-वर्तमानाचा विसर, भविष्याची ती केवळ एक आस...
एक तरणाबांड शेतकरी बीड जिल्ह्यातील कापसेवाडी येथून आपलं लालगर्ट कष्टं दहाहेक केडमध्ये टाकून कळंब येथील रविचारच्या आठवडी बाजारात पोहोचला होता. एका केटला वीसेक रुपये फक्त वाहतुकीचा खर्च पडला होता.
बाकी वर्तमानातील तोडणी अन् भूतकाळातील उत्पादन खर्चाचा विचार डोक्यातही न घेता तो भविष्याची आस लावत ग्राहकांची प्रतीक्षा करत होता. या भरल्या बाजारी भाव इतका निघाला की, तो कष्ठकरी अन् त्याचे कष्ट व्यवस्था नावाच्या दुष्टचक्रात चक्क चेभाव झाले.
प्रसंग २ : ओ काका, अहो मावशी... फकस्त दहाला दोन किलो !
त्या तरुणांचा आर्त हाक पायांना तिकडे खेचत गेली. चेहरा पाहुनी घ्या, फक्त दहाला किलो! तो सांगताना तळपत्या उन्हात घामाघूम झाला होता. मी ऐकून स्तब्ध झालो. यावर, 'भाव' करणारं गिऱ्हाईक दिसतंय ! असं त्याला वाटले बहुतेक, दीड किलो देतो!.
समोरून कमी दरात नको असा नकार मिळताच त्यांने आनंदाने माप टाकलं. बाजूला जरा पुढे गेलेला लालेलाल भाल होता. तिथं तर दहाला दोन किलो टोमॅटो होते. देणाऱ्यााने नाही; पण घेणाऱ्याने खजील व्हावं अशीच ही स्थिती होती. अबोल अन् निःशब्द करणारी,
प्रसंग ३ : लावलं त्यावेळी पाचशे, आज शे-दीडशे...
वाकडी (के) या प्रयोगशील शेतकयाचं गाव गाठलं. तेथील दिगंबर कोल्हे यांची एकरभर टॉमेटो फड़ात भेट घेत पाहणी करून माहिती जाणून घेतली. सकाळीच कळंबच्या बीट मार्केटला ६० फ्रेड पाच रुपये किलोच्या सरासरी भावाने घालून आले होते.
त्यांनी सप्टेंबर महिन्यात ९ हजार रोपे लावली होती. त्यावेळी पाचसहाशे क्रेटला भाव होता. आज शंभरेक रुपयाला क्रेट देऊन उत्पादन खर्चही पदरी नाही, अशी स्थिती.
प्रसंग ४ : मजुरांचा खर्च हाती पडला तरी बेहत्तर...
एका शेतकऱ्याचा फड अंतिम टप्प्यात होता. प्लॉटवर ठिकठिकाणी लालजर्द टोमॅटोची परंड पडलेली होती. जणूकाही लाल सहा टाकला आहे. एक महिला मजूर दिवसाला तीनशे रुपयाच्या आसपास हजेरी घेते. दिवसाला दहाबारा क्रेट टोमॅटो तोडणी करते.
आजच्या बाजारभावाने हा स्वर्च तरी पदरी पडेल का? यातूनच त्या शेतकऱ्याने आहे असा प्लॉट सोडून दिला आहे.
दीड वर्षापूर्वी एकच उच्चांकी डाव
जुलै २०२२ मध्ये एक पंधरवडाच टॉमेटो उच्चांकी स्तराला होते. क्रेडला दोन हजाराचा भाव पोहचला होता. तत्पूर्वी २०२२ मधील जून ते पुढील काही महिने तर अगदी ७० ते २०० रूपयात क्रेड होते. २०२४ मधील जून, जुलैमध्ये पण जरा चांगले दर होते. मात्र, जुलै २३ इतका उच्चांकी दर अशात एकदाही मिळाला नाही.
सध्या तरी लाखाचे बारा हजार...
एक एकर टॉमेटो लागवड करण्यासाठी दीड लाखावर खर्च येतो. यात अती चांगले उत्पादन हाती पडले तर २ हजार क्रेड, मध्यम आले तर दौडेक हजार अन् साधारण आले तर हजारेक फ्रेड मिळतात. क्रेडचे २ किलोचे वजन करता त्यात सर्वसाधारणपणे २३ किलो माल बसतो. सध्या हा सारा खेळ लाखांचे बारा हजार करणारा आहे.
बाजारभाव नवं वर्ष, असे आहेत
३ जानेवारी | ||||
मार्केट | आवक (क्चि) | किमान दर | कमाल दर | सर्वसाधारण दर |
मुंबई | २८४२ | १००० | १४०० | १२०० |
नाशिक | १८५९ | २५० | १००० | ६०० |
पुणे | २३१९ | ६०० | १४०० | १०५० |
१ जानेवारी | ||||
मुंबई | २०२५ | १२०९ | १६०० | १४०० |
नाशिक | १७७२ | २०० | १२०० | ७०० |
पिंपळगाव (ब.) | ११३५ | २५० | १४२६ | ११२५ |