सावंतवाडी : काजू बोंडसंदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व त्याची टीम भारतात येणार आहे.
येथील काजूची ते पाहणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरू केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार आहे.
काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, असा विश्वास सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
केसरकर म्हणाले, २ लाख हेक्टर जमिनीवर काजूची लागवड होते. यातील काजू गरावर प्रक्रिया होते. मात्र, काजू बोंड फुकट जात. ३ हजार २०० कोटींचे काजू बोंड वाया जात.
ब्राझील देशात यावर विशेष संशोधन झाले असून या बोंडापासून विविध प्रकारची पेये, काजूचा ज्यूस, मिट आदींसारखे पदार्थ बनवले जातात. दौऱ्यात यावर अभ्यास केला गेला. तसेच नॉन डिस्क्लोझर करार या दौऱ्यात करण्यात आला आहे.
लवकरच या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरू केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा: Farmer id : शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा; नाहीतर यापुढे मिळणार नाही या गोष्टींचा लाभ