भात किंवा तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास स्थूल होतो असा अनेकांच समज दिसून येतो. परंतु जे लोक ब्राऊन राईस खातात त्यांनी या समस्येबाबत निश्चिंत रहावे. कारण नॉन बासमती बाऊन राईस स्थूलपणा वाढवत नाही, तर हा तांदूळ वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणूनच असा तांदूळ आपल्या आहारात अवश्य सामिल करावा आणि त्यापासून मिळणाऱ्या फायद्याचा लाभ घ्यावा.
ब्राऊन राईस आणि पांढरे तांदूळ
• प्रथम ब्राऊन राईस आणि पांढरे तांदूळ यात काय फरक आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. ब्राऊन राईसला पॉलिश केलेले नसते. म्हणजे त्याच्यावरचे कोंड्याचे आवरण काढलले नसते. त्यामुळे यामधील पोषक घटक कडधान्ये किंवा सालासकट असलेल्या धान्या इतकेच असतात. पांढऱ्या तांदळावरील कोंड्याचे आवरण काढून प्रोसेसिंग करून ते पांढरे स्वच्छ पॉलिशयुक्त केले जातात. या प्रक्रियेदरम्यान तांदळामधील अनेक पोषक घटक कमी होतात.
• ब्राऊन राईसचा स्वाद, शिजण्यासाठी अधिक वेळ लागणे आणि अधिक दिवस न टिकणे यामुळे भारतात बहुतेक लोक हा तांदूळ वापरणे पसंत करत नाहीत. परंतु आता उत्तम तंत्राच्या मदतीने ब्राऊन राईस अधिक काळापर्यंत टिकवता येऊ शकतो. याचा स्वाद देखील आता बऱ्याच लोकांना पसंत पडू लागला आहे. ब्राऊन राईसमध्ये देखील नॉन बासमती फायदेशीर आहे. या तांदळ्याच्या दाण्यांचा आकार छोटा आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) कमी असतो.
नॉन बासमती बाऊन राईसच फायदे
• पांढऱ्या स्वच्छ तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसचे अनेक फायदे आहेत. ब्राऊन राईसमध्ये जीवनसत्त्वे, काही खनिजे, लिग्नान, फायटो केमिकल्स आणि अॅन्टीऑक्सिडंटस् यामुळे भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये ई जीवनसत्व, सिलेनियम, मॅगनीज असते. नियमितपणे हे तांदूळ आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत.
• कडधान्याच्या सर्वात उत्तम प्रकारापैकी ब्राऊन राईस एक आहे. यामध्ये शरीराचे ऑक्सिडेटीव्ह तणाव आणि आजार रोखण्यासाठी भरपूर प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असते. फायबरयुक्त होल ग्रेन्स आपल्या आहारात सामिल केल्यास मधुमेह, स्थूलपणा, हृदयाशी निगडीत आजार यासारख्या गंभीर समस्या बऱ्याच प्रमाणात दूर जातात.
नॉन बासमती ब्राऊन राईसमध्ये जीआयचे प्रमाण कमी
• नॉन बासमती ब्राऊन राईसमध्ये जीआयचे प्रमाण कमी असते. ज्या वेळी अन्न पचनक्रियेत जाते तेव्हा ते कार्बोहायड्रेड साखरेत परिवर्तीत होते आणि रक्तात साखरेचे प्रमाण वाढवते. ही प्रक्रिया जेवढ्या वेगात होते त्याचे मोजमाप जीआयद्वारे केले जाते. जीआय कमी असल्यास अन्न हळूहळू पचते.
• यामुळे पोट भरलेले असल्याचे जाणवते. परिणामी वाजन वाढणे यासारखी समस्या कमी होते. स्थूलपणा न वाढल्याने जीवनशैलीशी निगडीत अनेक आजार कमी होतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी ब्राऊन राईस खाणे फायद्याचे ठरू शकते.
नॉन बासमती ब्राऊन राईल शिजवताना त्यातील स्टार्च फेकू नये
नॉन बासमती ब्राऊन राईसमध्ये पण्यात विरघळणारे ब जीवनसत्व आणि खनिज असते. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हा तांदूळ आपण केव्हाही खाऊ शकतो. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट बराचकाळ भरल्यासारखे जाणवते. त्यामुळे कमी जीआय रक्तातील कोलेस्टरॉलची पातळी कमी करते. यामुळे रक्तातील साखरेची पतळीदेखील संतुलित राहाते. त्यामुळे हा तांदूळ आपण रात्रीच्या आहारात देखील सामिल करू शकतो.
ब्राऊन राईसचे फायदे
स्थूलपणा कमी करण्यासाठी मदत करतो, मधुमेहाचा धोका कमी करतो, हाडांमध्ये मँगनेशियमची कमतरता भरून काढतो. पोटासंबंधी असणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयोगी ठरतो. जीआय कमी असल्यामुळे हा तांदूळ खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. अधिक फायबर असल्याने पोट लवकर भरते. यातील अॅन्टीऑक्सिडंटमुळे तणाव आणि आजार रोखण्यासाठी मदत मिळते.
हेही वाचा : Nasapati Fruit : विविध आजारांवर गुणकारी त्रिदोषनाशक नासपती