गजानन मोहोड
अमरावती : पिकांचा उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळेबंद अलीकडे जुळत नसल्याने शेती बेभरवशाची होत आहे. त्यातच यंदा कपाशीच्या 'बीजी-२' पाकिटाची रुपयांनी ३७ दरवाढ झालेली आहे.(BT Cotton Seed)
जिल्ह्यात यंदा १५ लाख पाकिटे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन खर्च किमान ५.५५ कोटींनी वाढत आहे. त्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे.(BT Cotton Seed)
'कॉटनबेल्ट' असणाऱ्या जिल्ह्यात कापूस उत्पादकांची दैना झालेली आहे. नैसर्गिक आपत्तीने दरवर्षीच सरासरी उत्पादनात कमी येते. त्यातच कापसाला हमीभावही मिळत नाही.(BT Cotton Seed)
बोंडअळीला प्रतिबंधक जनुके असलेल्या 'बीजी-२' या कपाशीच्या वाणाची प्रतिबंधक शक्ती हरविल्याने दरवर्षीच बीटी कपाशीवर बोंडअळीचा अटॅक होत असल्याचे वास्तव आहे.
बाजारात बियाण्यांच्या दरात, मजुरीत वाढ इंधनाचे दर वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे. आतापासूनच एचटीबीटीचा शिरकाव झालेला आहे. सीमावर्ती भागात चोरबीटीमध्ये फसवणुकीचे प्रकारदेखील वाढले आहेत.
यंदा किमान १५ लाख पाकिटांची मागणी
यंदा सोयाबीनचे क्षेत्र कमी होऊन कपाशीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २.५० लाख हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात यंदा 'बीजी-२'ची किमान १५ लाख पाकिटे लागणार आहे.
असे वाढले बीटीचे दर (रु.)
२०२० | ७३० |
२०२१ | ७६७ |
२०२२ | ८१० |
२०२३ | ८५३ |
२०२४ | ८६४ |
२०२५ | ९०१ |
हे ही वाचा सविस्तर : Kharif Season : यंदा खरीप हंगामासाठी ३०० कोटींची उलाढाल वाचा सविस्तर