Join us

Budget 2024: शेतकऱ्यांचे लागवडीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी 'या' घोषणा

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 01, 2024 2:14 PM

खासगी आणि सरकारी अशा दोन्ही पातळ्यांवर केल्या जाणाऱ्या गुंतवणीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांचे पीक लागवडीनंतरचे नुकसान कमी करण्यावर प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी खासगी आणि सरकारी अशा दोन्ही पातळ्यांवर केल्या जाणाऱ्या गुंतवणीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि मिळकत वाढावण्यासाठी विविध घोषणा केल्या.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्य असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी येणाऱ्या काळात लागवडीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी मायक्रो फूड प्रोसेसिंगवर विशेष भर देण्यात आला आहे. या योजनेतून जवळपासू ६०,००० व्यक्तींना कर्जलाभ मिळाल्याचे सांगितले गेले.

कोणत्या प्रकारच्या गुंतवणूकीला प्राधान्य?

शेतकऱ्यांचे लागवडीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी  करण्यात येणाऱ्या गुंतवणूकीवर लक्ष देण्यात येणार आहे. यासाठी आधुनिक साठवण क्षमता, सक्षम पुरवठा साखळ्या, प्राथमिक आणि मध्यम प्रक्रीया उद्योग, मार्केटींग आणि ब्रँडींगला प्राधान्य दिले जाईल.

नॅनो DAP

नॅनो युरीयाच्या यशस्वी प्रगतीनंतर आता नॅनो DAP अमलात आणण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या कृषी हवामान भागात याची अंमलबजावणी होणार आहे.

आत्मनिर्भर तेलबीया अभियान

२०२२ मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत तेलबीयांचे उत्पादन वाढवण्यासाठी मोहरी , शेंगदाणे, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल याच्या उत्पादेनावर भर देण्यात येणार आहे.

या तेलबीयांच्या विविध जातींच्या संशोधनाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी अधूनिक शेतीच्या पद्धती विकसीत करून त्या कशा अंगीकारता येतील यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

टॅग्स :अर्थसंकल्प 2024शेती क्षेत्रलागवड, मशागतनिर्मला सीतारामन