Join us

अर्थसंकल्प २०२४: मागच्या वर्षी कृषीसाठी काय काय झाल्या घोषणा?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 31, 2024 11:15 AM

घेऊया थोडक्यात आढावा...

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन १ फेब्रुवारी रोजी या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प उद्यावर येऊन ठेपला आहे.  

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, २०२३-२४ या आर्थिक वर्षात केंद्रीय अर्थसंकल्पात काय काय मांडण्यात आले होते? याचा हा थोडक्यात आढावा.. 

अन्न उत्पादन, मोफत अन्न योजना, अनुदाने आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचे महत्व यावर भर देण्यात आला होता. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला १,२५,०३६ कोटी रुपये देण्यात आले होते.जे २०२२ च्या अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या अंदाजापेक्षा सुमारे पाच टक्क्यांनी अधिक आहे. यापैकी १,१५,५३२ कोटी रुपये कृषी विभागाकडे गेले. 

काय घोषणा केल्या होत्या?

  • पीक मुल्यांकन, कीटकनाशक फवारणी आणि जमिनीच्या नोंदण्यांचे डिजिटलायझेशन यासाठी किसान ड्रोनचा वापर
  • गहु आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान केलेल्या किमान आधारभूत किमतीसाठी २.३७ ट्रिलियन रुपयांची थेट देयके
  • तरुण उद्योजकांच्या कृषी स्टार्टअप्सना कृषी प्रवेगक निधी सुरु करून पाठिंबा दिला जाईल
  • दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन यावर विशेष लक्ष केंद्रित करून कृषी कर्ज २० ट्रिलियन रुपयांपर्यंत वाढवण्याचे उदिष्ट
  • १० दशलक्ष शेतकऱ्यांना शाश्वत कृषी पद्धतींना चालना देऊन नैसर्गिक शेतीकडे जाण्यासाठी सक्षम करण्याची योजना
  • शेतकऱ्यांना उत्पादन साठवून ठेवण्यासाठी आणि वेळेवर विक्रीद्वारे रास्त भाव मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकेंद्रित साठवण क्षमतेची स्थापना 

कोणत्या योजना सुरु केल्या?

  • पीएम मत्स्यसंवर्धन योजनेअंतर्गत ६००० कोटी रुपयांच्या लक्षित गुंतवणूकीसह नवीन उपयोजना सादर करण्याचे उदिष्ट होते. मासळी, विक्रेते, मच्छीमार आणि सुक्ष्म आणि लघू व्यवसायांना सक्षम करणे हा यामगचा उद्देश होता. 
  • पायाभूत सुविधांची निर्मिती- कृषीसाठी डिजिटल पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याची योजना करण्यात आली होती. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी निविष्ठा, बाजारपेठेतील बुद्धीमत्ता आणि कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी सहाय्य वाढवणे हा उद्देश होता. 
  • शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देऊन पर्यायी खतांचा अवलंब करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रोत्साहन देण्यासाठी पीएम प्रणाम अशी योजना सुरु करण्यात आली होती. 
  • ६३ हजार कृषी पतसंस्थांसाठी २५१६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. 

यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पासाठी काय अपेक्षा?

लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प दोन दिवसांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल?

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढणारअनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी करीत होते. आता सरकारकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १८ हजारांवरून वाढून २६ हजार रुपये होऊ शकते.

शेतकरी सन्मान निधीची रक्कम वाढणार?निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या ६ हजार असलेला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ९ हजारांपर्यंत वाढविण्याचा अंदाज आहे. महिला शेतकऱ्यांना हा सन्माननिधी प्रतिवर्ष १२ हजार रुपये करण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :अर्थसंकल्प 2024शेती क्षेत्रशेतकरी