Join us

फुलाचं रोप विकत घेताय ? मग जरा जपून, अशी होतेय धूळफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 5:00 PM

आकर्षक फुल म्हणून होतेय फसवणूक..

मागील वर्षी काही ठिकाणी आकर्षक फुले म्हणून जलपर्णीची विक्री होत होती. आता याही वर्षी छत्रपती संभाजीनगर  शहरातील काही ठिकाणी २० रुपयांना जलपर्णीची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. पर्यावरणप्रेमींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

शहरात एक महिला फुलांची रोपं एका टोपल्यात विकत होती. त्या टोपलीमध्ये फुलांचा फोटो होता. त्यामुळे ही रोपे चांगली समजून काही लोक खरेदी करण्यास जात होते. मात्र, ही रोपं बागेतील पाण्यात लावल्यास तो भाग प्रदूषित होऊ शकतो, यामुळे त्या महिलेला अशी रोप विकण्यापासन रोखण्यात आले. 

जलपर्णी या वनस्पतीस पानवेली किंवा वॉटर हायसिन्थ असे म्हटले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Eichhornia Crassines आहे..जेव्हा नदी, तलाव यात सांडपाणी किंवा घाण पाणी मिसळते, तेव्हा या वनस्पतीस त्यातून खत खाद्य मिळते. सूर्यप्रकाशात ती प्रचंड वेगाने फोफावते व संपर्ण नदी नाले व्यापून टाकते. पाण्यावर वनस्पतीचा जाड थर निर्माण होतो. जलपर्णी सौरऊर्जा शोषून हजारो टन जैववस्तुमानाच्या रूपात ऊर्जा साठवण करते.

महापालिकेने काढली जलपर्णी

छत्रपती संभाजी महाराज तलावात जलपर्णी आहे. महापालिकेकडून ही जलपर्णी काढण्यात आली आहे. माजी सैनिक नगर येथील तलावाच्या भागातील जलपर्णीही काढण्यात आली आहे. सध्या तलाव स्वच्छ दिसत असले तरी काही दिवसांनी पुन्हा जलपर्णी वाढेल अशी शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

प्रदूषण करणारे वनस्पती नका घेऊ

नागरिकांनी केंदाळ या वनस्पतीचे रोपे खरेदी करू नयेत. एखाद्या वेळेस नजरचुकीने ही रोपे घेतल्यास ती नष्ट करावीत. आपल्या चुकीमुळे ते निसर्गात पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन निसर्गप्रेमी मुकुंद शेटे यांनी केले.

विजापूर रोड नेहरू नगर येथे एक महिला जलपर्णी विकत होत्या. त्यांना याबाबत मी विचारले. तसेच हे शोभेच्या फुलांचे रोप नसून जलपर्णी असल्याचे सांगितले. ही जलपर्णी एकदा वाढल्यास पाण्यातील ऑक्सिजन संपवून टाकते. या वनस्पतीची वाढ रोखता येत नाही. त्यामुळे सोलापूरकरांनी ही वनस्पती शोभेची रोप म्हणून खरेदी करू नये. -सचिन जोशी, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :फुलंशेतकरीधोकेबाजी